प्रत्येक शाळेत आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणे आवश्यक जिल्हाधिकारी अभिनव कोयल

By : Polticalface Team ,13-01-2024

प्रत्येक शाळेत आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणे आवश्यक जिल्हाधिकारी अभिनव कोयल धुळे प्रतिनिधी : दिनांक 12 जानेवारी, 2024 नैसर्गिक आपत्तीबाबत विद्यार्थीदशेतच विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाची माहिती मिळावी यासाठी प्रात्याक्षिकांसह प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,धुळे तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज सावळदे ता.शिरपूर येथे पूर व्यवस्थापन या विषयी रंगीत तालीम व स्कुबा डायव्हींगचे प्रशिक्षण संपन्न झाले. त्यावेळी श्री.गोयल बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे, तहसिलदार महेंद्र माळी,पोलीस उपअधिक्षक सचिन हिरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.दत्ता देगांवकर, राज्य आपत्ती व्यवस्थानाचे सहायक समादेशक चंद्रकांत पारसकर, पोलीस निरीक्षक योगेशकुमार शर्मा, सहायक रितेश कुमार, मुख्याधिकारी श्री.नेरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे, सरपंच अनिल महाजन, उपसरपंच सचिन राजपूत, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठोबा महाजन, आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अभिनव गोयल म्हणाले की, अचानक उद्‌भवलेल्या नैसर्गिक आपत्ती उद्‌भवल्यास विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे अशा परिस्थितीमुळे मोठी हानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या संकटांना तोंड देण्यासाठी प्रत्येक शाळामधुन मुलांना आपत्तीव्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्याच बरोबरच पालकांनीही आपल्या मुलांना भूकंप, पूर,वीज पडल्यावर काय करायला पाहिजे यागोष्टी सांगितल्या पाहिजे. त्यामुळे आपत्तीकालीन परिस्थितीत आपण स्वत:चा तसेच इतर लोकांचे जीव वाचवू शकतो. युटयूब तसेच संकेतस्थळावर आपत्तीकाळात काय करावे काय करु नये याबाबत भरपूर माहिती मिळते या माहितीच्या आधारे मुलांना व आपल्या गावातील नागरिकांना माहिती दिल्यास या माहितीचा निश्चित उपयोग होईल. जिल्हा प्रशासनामार्फत गतीमान प्रशासन अभियानंतर्गत लाईफ जॅकेट, स्टेचर व इतर आवश्यक साहित्य खरेदी करुन देण्यात येत आहे. तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने आपत्तीसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी तयार करुन दिल्यास गतीमान प्रशासन अभियानातंर्गत किंवा जिल्हा वार्षिक योजनेतून साहित्य खरेदी केले जाईल. जेणे करुन गावस्तरावर, तहसिलस्तरावर या आवश्यक साहित्यांचा आपत्तीकालात त्याचा उपयोग होईल. आपत्तीकालीन परिस्थितीत मदत करणाऱ्या व्यक्तींची ओळख पटावी म्हणून टि शर्ट देण्यात यावे.तसेच त्यांना आपदा मित्र उपाधी देवून त्यांना सन्मानाची वागणुक द्यावी जेणे करुन ती व्यक्तीं अधिक उत्साहाने काम करतील असे त्यांनी सांगितले.
यावेळी आपत्तीचे नैसर्गिक, मानवनिर्मित प्रकार, आपत्ती व्यवस्थापनेचा मुख्य उद्देश, मनुष्य, आर्थिक हानी कमी कशी करता येते, वेगवेगळ्या स्तरावर आपत्तीबाबत जनजागृती, आपत्तीची तीव्रता कमी करणे आदी माहिती समजावून सांगण्यात आली. नैसर्गिक आपत्तीमध्ये आग लागणे, चक्रीवादळ, भूकंप, दुष्काळ, पूर, दरड कोसळणे, त्सुनामी आदी आपत्तींमध्ये कशाप्रकारे काळजी घ्यावयाची किंवा व्यवस्थापन कसे करावे, हे प्रात्यक्षिकांसह दाखविण्यात आले. आपत्ती व्यवस्थापनाने जनजीवन पूर्वपदावर कसे आणता येते, सुसूत्र पद्धतीने केलेल्या नियोजनामुळे नुकसान कसे कमी करता येऊ शकते, हे समजावून सांगितले. व्यवस्थापनाचे टप्पे, प्रतिबंध, पूर्वतयारी, विमोचन, मदत पुनर्वसन, पुनर्रचना आदि मुद्देही यावेळी विद्यार्थ्यांना सविस्तरपणे समजावून सांगण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.जाधव यांनी तर आभार प्रदर्शन उपसरपंच सचिन राजपूत यांनी केले. यावेळी पोलीस विभाग,जिल्हा परिषद,महापालिकचे अग्निशमन विभाग,गृहरक्षक दल, जिल्हा आरोग्य विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, नगरपालिका, सावळदे ग्रामपंचायतील नागरिक, तसेच आर.सी.पटेक हायस्कुल,सावळदे येथील मोठ्या संख्येन विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मान्यवराच्या हस्ते गावस्तरावर पट्टीच्या पोहणाऱ्याचा सत्कार करण्यात आला.यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुरेश सपकाळ राज्य आपत्ती व्यवस्थापनाचे जवान तात्या बागुल, दिनेश तायडे, प्रकाश शिंदे, धुळे महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाचे अतुल पाटील याचे सहकार्य लाभले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.