प्रत्येक शाळेत आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणे आवश्यक जिल्हाधिकारी अभिनव कोयल
By : Polticalface Team ,13-01-2024
धुळे प्रतिनिधी
:
दिनांक 12 जानेवारी, 2024
नैसर्गिक आपत्तीबाबत विद्यार्थीदशेतच विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाची माहिती मिळावी यासाठी प्रात्याक्षिकांसह प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,धुळे तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज सावळदे ता.शिरपूर येथे पूर व्यवस्थापन या विषयी रंगीत तालीम व स्कुबा डायव्हींगचे प्रशिक्षण संपन्न झाले. त्यावेळी श्री.गोयल बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे, तहसिलदार महेंद्र माळी,पोलीस उपअधिक्षक सचिन हिरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.दत्ता देगांवकर, राज्य आपत्ती व्यवस्थानाचे सहायक समादेशक चंद्रकांत पारसकर, पोलीस निरीक्षक योगेशकुमार शर्मा, सहायक रितेश कुमार, मुख्याधिकारी श्री.नेरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे, सरपंच अनिल महाजन, उपसरपंच सचिन राजपूत, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठोबा महाजन, आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अभिनव गोयल म्हणाले की, अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे अशा परिस्थितीमुळे मोठी हानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या संकटांना तोंड देण्यासाठी प्रत्येक शाळामधुन मुलांना आपत्तीव्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्याच बरोबरच पालकांनीही आपल्या मुलांना भूकंप, पूर,वीज पडल्यावर काय करायला पाहिजे यागोष्टी सांगितल्या पाहिजे. त्यामुळे आपत्तीकालीन परिस्थितीत आपण स्वत:चा तसेच इतर लोकांचे जीव वाचवू शकतो. युटयूब तसेच संकेतस्थळावर आपत्तीकाळात काय करावे काय करु नये याबाबत भरपूर माहिती मिळते या माहितीच्या आधारे मुलांना व आपल्या गावातील नागरिकांना माहिती दिल्यास या माहितीचा निश्चित उपयोग होईल. जिल्हा प्रशासनामार्फत गतीमान प्रशासन अभियानंतर्गत लाईफ जॅकेट, स्टेचर व इतर आवश्यक साहित्य खरेदी करुन देण्यात येत आहे. तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने आपत्तीसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी तयार करुन दिल्यास गतीमान प्रशासन अभियानातंर्गत किंवा जिल्हा वार्षिक योजनेतून साहित्य खरेदी केले जाईल. जेणे करुन गावस्तरावर, तहसिलस्तरावर या आवश्यक साहित्यांचा आपत्तीकालात त्याचा उपयोग होईल. आपत्तीकालीन परिस्थितीत मदत करणाऱ्या व्यक्तींची ओळख पटावी म्हणून टि शर्ट देण्यात यावे.तसेच त्यांना आपदा मित्र उपाधी देवून त्यांना सन्मानाची वागणुक द्यावी जेणे करुन ती व्यक्तीं अधिक उत्साहाने काम करतील असे त्यांनी सांगितले.
यावेळी आपत्तीचे नैसर्गिक, मानवनिर्मित प्रकार, आपत्ती व्यवस्थापनेचा मुख्य उद्देश, मनुष्य, आर्थिक हानी कमी कशी करता येते, वेगवेगळ्या स्तरावर आपत्तीबाबत जनजागृती, आपत्तीची तीव्रता कमी करणे आदी माहिती समजावून सांगण्यात आली. नैसर्गिक आपत्तीमध्ये आग लागणे, चक्रीवादळ, भूकंप, दुष्काळ, पूर, दरड कोसळणे, त्सुनामी आदी आपत्तींमध्ये कशाप्रकारे काळजी घ्यावयाची किंवा व्यवस्थापन कसे करावे, हे प्रात्यक्षिकांसह दाखविण्यात आले. आपत्ती व्यवस्थापनाने जनजीवन पूर्वपदावर कसे आणता येते, सुसूत्र पद्धतीने केलेल्या नियोजनामुळे नुकसान कसे कमी करता येऊ शकते, हे समजावून सांगितले. व्यवस्थापनाचे टप्पे, प्रतिबंध, पूर्वतयारी, विमोचन, मदत पुनर्वसन, पुनर्रचना आदि मुद्देही यावेळी विद्यार्थ्यांना सविस्तरपणे समजावून सांगण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.जाधव यांनी तर आभार प्रदर्शन उपसरपंच सचिन राजपूत यांनी केले.
यावेळी पोलीस विभाग,जिल्हा परिषद,महापालिकचे अग्निशमन विभाग,गृहरक्षक दल, जिल्हा आरोग्य विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, नगरपालिका, सावळदे ग्रामपंचायतील नागरिक, तसेच आर.सी.पटेक हायस्कुल,सावळदे येथील मोठ्या संख्येन विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मान्यवराच्या हस्ते गावस्तरावर पट्टीच्या पोहणाऱ्याचा सत्कार करण्यात आला.यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुरेश सपकाळ राज्य आपत्ती व्यवस्थापनाचे जवान तात्या बागुल, दिनेश तायडे, प्रकाश शिंदे, धुळे महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाचे अतुल पाटील याचे सहकार्य लाभले.
वाचक क्रमांक :
शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल
कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान
बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती
दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती
श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते
संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन ------------- ह.भ. प. दंडवते महाराज
राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक
आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे
छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!
वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न
करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे
करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.