दुधनीतील शाळकरी मुले व गर्भवती महिलांच्या जीव वाचवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पर्यायी मार्ग करण्याचे रिपाइं ची मागणी
By : Polticalface Team ,13-01-2024
अक्कलकोट(प्रतिनिधी)दि,१२ अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील शाळकरी मुले व गर्भवती महिलांच्या जीव वाचविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उड्डाण फूल किंवा भुयारी मार्ग करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन रिपाइं (आठवले गट)च्या जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांनी सोलापूर रेल्वे मंडल प्रबंधक नीरजकुमार दोहरे यांच्या कडे देण्यात आली आहे.
मंडल रेल्वे प्रबंधक सोलापूर
यांच्या सचिवालय प्रमुख ताजुद्दीन शेख यांना समक्ष भेटून विविध कामा बाबत आणी दुधनी रेल्वे स्टेशनचे अमृत भारत स्टेशन योजनेत समाविष्ट झाल्यांने त्या अंतर्गत दुधनी रेल्वे स्टेशन येथे विविध कामे चालु असून त्यातील कामे अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होवून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केली जात आहे. तरी आपण जातीने लक्ष घालून संबंधीत अधिकार्यां मार्फत चौकशी करण्यात यावे.अशी मागणी यावेळी केली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील दुधनी रेल्वे स्टेशन चे अमृत भारत स्टेशन योजनेत समाविष्ठ झाल्याने येथे विविध शुशोभीकरण करण्यासाठी शासनाकडून एकवीस कोटी रुपये मंजूर आहे. त्यामुळे काम मोठ्या प्रमाणात चालु आहे या योजने अंतर्गत येथे गावाच्या पलीकडे असलेल्या परमशेट्टी हायस्कूलला आणी प्राथमिक आरोग्य केंद्राला जाण्यासाठी शाळकरी मुलांना आणी गर्भवती महिलांना ये जा करण्यासाठी भुयारी मार्ग किंवा उड्डाण फूल करण्यात यावे. दवाखान्याला जाण्यासाठी अंब्यूलन्स तिन ते चार कि मि व्हाय करुन यावे लागते.त्यात रेल्वे गेट पडल्यास वेळेवर पेशंट पोहचू शकत नाही तरी या अडचण दूर करण्यासाठी उड्डाण फूल किंवा भुयारी मार्ग बांधण्यात यावे.
आणी सद्या चालु असलेल्या कामाचे चौकशी करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन दिली आहोत.
दुधनी रेल्वे स्टेशन येथे अनेक कामे मंजूर असून सर्व कामे इंजिनियरचा अनुपस्थितीत संबधीत कंत्राटदारा मार्फत होत आहे.सदर कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे चालली आहे. यात विविध ठिकाणी वापरलेली मटेरीयल अत्यंत निकृष्ठ दर्जाचे व काही ठिकाणी जुनाच मटेरियल चे वापर केली आहे. यातील कंट्रक्टर मोठ्या प्रमाणात आर्थिक अव्यवहार झाल्याचे आता पर्यंत केलेल्या कामावरुन दिसून येत आहे.क्वालिटी ब्यूरो मार्फत पडताळणी केलेल्या एकही मटेरियल येथे वापरली नाही. सर्वचे सर्व निकृष्ठ व जुने सामान वापरुन काम करत आहे. या सर्व प्रकारचे खडी,सिमेंट,डस्ट,लोखंडी पत्रे,स्टिल आणी रेती हे सर्व कनिष्ठ प्रकारच्या वापरुन करत आहे. येथे बाधकाम कामात वापरलेले सर्व वाशे जुनाच वापरलेली आहे. या ठिकाणी काही भिंत जुनाच असून त्याभिंतिलाच टाचे मारुन प्लास्टर केली जात आहे. तरी या सर्व बाबीचे सखोल चौकशी संबंधीत वरीष्ठ अधिकार्यां मार्फत करावे. आणी दुधनी साठी स्वतंत्र इंजिनियरचा नियुक्त्या करण्यात यावे.अशी मागणीही केली आहे. या निवेदन देतांना रिपाइं जि उपाध्यक्ष सैदप्पा झळकी दुधनी शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमनीमुस्लिम आघाडी शहर अध्यक्ष महेदिमिंया जिडगे आदि उपस्थित होते.
सदर निवेदनाची प्रती जि एम विभागीय रेल्वे म्यानेंजर,रेल्वे मंत्री भारत सरकार नई दिल्ली,डां.रामदास आठवले साहेब
सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार,मा.राजाभाऊ सरवदे माजी राज्यमंत्री महाराष्ट्र.यांना पाठवले आहे.
वाचक क्रमांक :
शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.