माऊली क्रिटिकल केअर हॉस्पिटल व डॉ.गुरुप्रसाद गोरे यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान शिबीर

By : Polticalface Team ,Wed Dec 08 2021 13:42:03 GMT+0530 (India Standard Time)

माऊली क्रिटिकल केअर हॉस्पिटल व डॉ.गुरुप्रसाद गोरे यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान शिबीर पाथर्डी प्रतिनिधी: आजच्या काळात जीवन शैलीत आणि आहारात झालेल्या बदलामुळे अनेक व्याधीचा सामना करावा लागतो. विशेषतः वयस्कर लोकांना मधुमेह , उच्च रक्तदाब आणि सांधेदुखी या सारख्या आजारांनी ग्रासले जाते . योग्य वेळी आजाराचे निदान होणे हेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे मोफत सर्वरोग निदान व आरोग्य तपासणी शिबिर ही काळाची गरज आहे, असे मत डॉ. संतोष गिते यांनी पाथर्डी शहरातील सावता महाराज मंदिर येथे आयोजित सर्वरोग निदान शिबिरात व्यक्त केले. अहमदनगर येथील माऊली क्रिटिकल केअर हॉस्पिटल आणि डॉ .गुरुप्रसाद गोरे यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अहमदनगर येथील डॉ. संतोष गिते, एम. डी मेडिसिन आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. गणेश मिसाळ , डॉ. ऋषी निर्मळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व रोग निदान व उपचार शिबिर संपन्न झाले. या शिबिरात मधुमेह , उच्च रक्तदाब , संधीवात , मणके विकार , किडणी विकार तसेच लहान मुलांची आरोग्य तपासणी करून निदान करण्यात आले. तसेच मोफत औषधोपचार करण्यात आले. या शिबिरामध्ये १७६ गरजू रुग्णांनी लाभ घेतला. या वेळी मेडिलिक्स हॉस्पिटलचे डॉ. स्वागत ससाणे , बालरोगतज्ज्ञ डॉ. वैभव नागरे ,डॉ.अनिल पानखडे ह.भ.प.माधव बाबा , ह.भ.प. मोहन महाराज सुडके , राजेंद्र उदारे , अभिजित बोरुडे , प्रथमेश नाकील , पंकज गायकवाड , विशाल देखणे तसेच सागर शिंदे उपस्थित होते. शिबिर यशस्वीतेसाठी जनसंपर्क अधिकारी गणेश जोशी , अशोक पालवे , लॅब टेक्निशियन माऊली मिसाळ , देविदास शिंदे , अर्जुन साखरे , नंदकुमार लांबदाडे, राजेंद्र काळे , सुरेश गोरे यांचे विशेष सहकार्य लाभले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद