By : Polticalface Team ,01-02-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ०१ फेब्रुवारी २०२४ दौंड शहरातील श्री अष्टविनायक बहुउद्देशीय सभागृह राज्य राखीव पोलीस बल गट क्र,७ या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून, दौंड शहर येथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अभंग व भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते,
या स्पर्धेमध्ये दौंड तालुका ग्रामीण भागातील एकूण ७४ भजनी मंडळांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील अभंग रचना आत्मसात करून मधुर सुरांच्या आवाजात उपस्थित वारकरी जनसमुदाय व नागरिक पारंपरिक अभंग सुरांनी भाराऊन गेले होते, हेवा वाटावा असा उत्कृष्ट भजनी मंडळाच्या स्पर्धा कार्यक्रमाने या परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते,
जगद्गुरु संत तुकाराम महाराज अभंग स्पर्धा कार्यक्रमात यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील, ज्योतिर्लिंग महादेव भजनी मंडळाने प्रथम पारितोषिक मिळवले, तर द्वितीय पारितोषिक नागेश्वर प्रा,सा,दिंडी,भजनी मंडळ पाटस, आणि गोपीनाथ महाराज भजनी मंडळ वरवंड, यांना विभागून देण्यात आले, या स्पर्धा कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या १) श्रीराम महिला भजनी मंडळ यवत २) वरद विनायक भजनी मंडळ राहू पिंपळगाव, ३) ज्योतिर्लिंग भजनी मंडळ हिंगणीबेर्डे, ४) श्रीराम भजनी मंडळ केडगाव, ५) पांडुरंग भजनी मंडळ यवत या सांप्रदायिक मंडळांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले, स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या मंडळांना दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा आप्पासाहेब पवार यांच्या हस्ते सहभाग पत्र देऊन सन्मानित करण्यात आले, या प्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष रामभाऊ अण्णा टुले, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस अजित शितोळे युवक अध्यक्ष सचिन काळभोर सोशल मीडिया अध्यक्ष चेतन पाटोळे ह भ प सोपान काका वाल्लेकर स्पर्धा प्रमुख रघुनाथ खंडाळकर स्पर्धेचे समन्वयक विवेक थिटे संदीप राक्षे स्पर्धेचे आयोजक वसंत सोनटक्के अशोक दीक्षित अजय दीक्षित सुनील माने या मान्यवरांनी दौंड येथे अभंग स्पर्धांचे आयोजन केली होते दौंड तालुक्यातील बहुतांश भजनी मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता,
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मुक्कामाचे ठिकाण म्हणजे यवत,या गावातील भजनी मंडळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक मिळवणाऱ्या भजनी मंडळातील, ज्येष्ठ ह भ प, बबनराव राजगुरू, रघुनाथ दादा महामुनी, ह भ प राहुल महाराज राजगुरू, ह भ प दीपक महाराज मोटे, तसेच यवत गावातील विठ्ठल भजनी मंडळातील सर्व महिला व सहकारी यांचे यवत ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला,
यवत ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच समीर दोरगे, विद्यमान उपसरपंच सुभाष यादव, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य नाथदेव दोरगे,या मान्यवरांच्या हस्ते, दौंड येथील स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळवणाऱ्या वारकरी सांप्रदायातील मान्यवरांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, या प्रसंगी यवत ग्रामपंचायतचे सरपंच बोलताना म्हणाले माझ्या राजकीय जीवनात आज पर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात वारकरी संप्रदायातील मान्यवरांचा सत्कार हा कार्यक्रम कधी पाहिला नाही, या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळवणाऱ्या भजनी मंडळांनी यवत गावचा सन्मान वाढविला आहे, तसेच दि,१४ फेब्रुवारी २०२४ रोजी पुणे शहरात होणाऱ्या पुढील अभंग स्पर्धेमध्ये ही पारितोषिक यवत येथील भजनी मंडळ मिळवणार यात काही शंका नाही, अशी प्रतिक्रिया समीर दोरगे यांनी व्यक्त करुन, यवत ग्रामपंचायत व नागरिकांच्या वतीने शुभेच्छा दिल्या, या प्रसंगी उपसरपंच सुभाष यादव, शितल ताई दोरगे, आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते सुरज चोरगे यांनी केले, तर या संन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या, भारतीय जनता मोर्चा पार्टीच्या तालुका अध्यक्षा शितल ताई दोरगे, तसेच विक्रम दोरगे, सामाजिक कार्यकर्ते रमेश (आप्पा) दोरगे, सामाजिक कार्यकर्ते चेतन ढवळे. यांचा ही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी यवत पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायातील व भजनी मंडळातील मान्यवर नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती.
वाचक क्रमांक :