By : Polticalface Team ,02-02-2024
शेलार म्हणाले ओबीसी आरक्षण मध्ये मराठा कुणबी सरसकट समावेश निर्णयामुळे ओबीसी प्रवर्गात नाराजी आहे . या मेळाव्यास धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर तसेच ओबीसी प्रवर्गात समाविष्ट जातींचे नेते उपस्थित राहणार आहेत .
मराठा आरक्षणावर जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य सोशल मीडिया वर ओबीसी मंडळींनी करू नये . सर्व जाती एक आहेत याला गालबोट लावू नये असेही आवाहन शेलार यांनी केले .
ओबीसी आरक्षण बाबत मंत्री नामदार छगन भुजबळ प्रथम पासून पुढे आहेत श्रीगोंदा तालुक्यातील ओबीसी मंडळींनी या मेळाव्यात उपस्थित रहाणे गरजेचे आहे असे माजी उपनगराध्यक्ष राजू गोरे , गोरख आळेकर,समता परिषदेचे बंडू कोथिंबीरे यांनी म्हटले आहे .शेडगावचे माजी सरपंच विजय शेंडे ,खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष शरद जमदाडे , सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब कोळपे , संजय डाके, गोरख आळेकर ,सामाजिक कार्यकर्ते मुकुंद सोनटक्के , सुरेश सुपेकर , खलील पठाण , दस्तगीर इनामदार , काळे आदींसह कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते .