श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील अवैद्य दारू बंद करण्यातयावी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला निवेदन
By : Polticalface Team ,02-02-2024
श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे सर्रास अवैध्य दारू विक्री होत असून त्यावर प्रशासनाचा पण धाक राहिला नाही, त्यामुळे
अवैधरित्या होणारा दारू विक्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच दारू पिऊन नागरिक शाळेसमोर येऊन त्रास देतात. दारू व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची दादागिरी वाढली असून यांच्यापासुन गावातील जनतेला त्रास होतो. शाळाजवळ असल्यामुळे वाद भांडणे कायम चालू असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. तसेच गावात अशांतता निर्माण होत आहे. तरी याबाबींचा सबंधित व्यक्तीवर कडक कार्यवाही करण्यात यावी. तरी या पत्रांचा गांभीर्याने विचार व्हावा या स्वरूपाचे निवेदन इरफान पिरजादे सरपंच ग्रामपंचायत पेडगाव व ग्रामस्थांच्या वतीने पोलीस निरीक्षक श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे देण्यात आले या वेळी लोकनियुक्त सरपंच इरफान भाई पिरजादे, उपसरपंच पती अशोक गोधडे, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार कंगणे, आप्पा मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते
वाचक क्रमांक :