सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होणार नाही - केशव भाऊ मगर
By : Polticalface Team ,Sat Dec 11 2021 13:32:57 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा(प्रतिनिधी):-सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होणार नसून सत्ताधारी बिनविरोध ची अफवा पसरवत असून आमचा उद्देश सहकार महर्षी स्व.शिवाजीराव नागवडे यांनी ४५ वर्ष सहकारी साखर कारखाना टिकवला त्याप्रमाणे कारभार करण्यासाठी आम्ही निवडणुकीत सभासदांना मते मागणार असल्याचे सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना माजी व्हाईस चेअरमन केशव भाऊ मगर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले .मगर म्हणाले स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी ४८ वर्ष सभासद हिताचा कारभार केला आम्ही देखील त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले पण त्यांचे पुत्र राजेंद्र नागवडे यांनी कारखान्यात चुकीचा कारभार केल्याने आपण दूर झालो चुकीचा कारभार सभासदांना दाखवला आता निवडणूक जाहीर झाल्याने सत्ताधारी बिनविरोध निवडणुकीची अफवा पसरवत असून आपण कारखाना टिकावा म्हणून पारनेर,राहुरी,जगदंबा सहकारी साखर कारखान्या सारखी नागवडे कारखान्याची अवस्था होऊ नये म्हणून निवडणूक लढवू
काही जण स्वर्गीय नागवडे नंतर राजेंद्र नागवडे यांना कारभार करू देण्याची मागणी करत आहेत पण आम्ही व सभासदांनी २ वेळा राजेंद्र नागवडे यांचा चेअरमन पदाला किती न्याय दिला हे पहिले आहे,सहवीजनिर्मिती मध्ये पैसे वाचविल्याचा डांगोरा पिटला जात आहे पण २६ मेगावँट वीजनिर्मिती धूळफेक असून हंगाम वगळता इतर वेळी वीजनिर्मिती होणार नसल्याने ७,८ महिने व्याज भरावे लागणार आहे
डिस्टलरी मध्ये लक्ष न दिल्याने दरवर्षी ८कोटी रुपये बुडत आहेत
असे सांगून बिनविरोध निवडणूक करून संचालक होऊन राजेंद्र नागवडे यांच्या चुकीच्या कारभारात सामील होऊन कारखाना डबघाईला आणून सभासदांचे नुकसान करणे आम्हाला मान्य नसून आम्ही स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांच्या स्वप्नातील सभासद हिताच्या कारभारास प्राधान्य देत असल्याने निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे सांगितले
यावेळी पंचायत समितीचे सदस्य जिजाबापू शिंदे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती वैभव दादा पाचपुते,अजित जामदार आदी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :