By : Polticalface Team ,06-02-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.दौंड ता,०५ फेब्रुवारी २०२४ दौंड शहर बाजार पेठेतील मुख्य रस्ता वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची ना हक डोकेदुखी ठरत असल्याने, व दररोजच्या दळण वळणाचा प्रश्न ऐरणीवर असल्याने नवनिर्वाचित दौंड पोलीस निरीक्षक मा, चंद्रशेखर यादव यांनी अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेऊन सर्व सामान्य नागरिकांना दिलासा दिला दिल्याने अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच ही अतिक्रमण हटाव कारवाई फक्त सुरुवातीच्या एन्ट्रीला आहे की काय ? असा ही प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे,
वास्तविक पाहता दौंड शहरातील मुख्य बाजार पेठेत छोटा मोठा उद्योग व्यवसाय करणाऱ्यांची संख्या अधिक प्रमाणात आहे, अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे त्यांच्या उदरनिर्वाणाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे बोलले जात आहे,
दौंड शहरात मुख्य बाजार पेठेतील रस्ता व वाहतूक कोंडीचा प्रश्न सतत निर्माण होत असल्याने तत्पूर्वी दौंड नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण संदर्भात अनेक वेळा कारवाई मोहीम राबविण्यात आली, मात्र बाजार पेठेतील रस्ता खुला करण्यास म्हणावे तसे येश मिळाले नाही, यापूर्वी वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावर पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दौंड शहरातील बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या, टू व्हीलर, फोर व्हीलर, वाहनांवर कारवाईची मोहीम राबविण्यात आली होती, या संदर्भात शहरात एकच खळबळ उडाली होती,
मात्र वाहतूक कोंडीचा प्रश्न व अतिक्रमण संदर्भात फारसा बदल झाला नसल्याचे बोलले जात आहे,
दौंड पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील
यांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची वर्णी लागताच पुन्हा शहरातील रस्ते व वाहतूक कोंडी बेकायदेशीर अतिक्रमण संदर्भात कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे, तसेच दौंड शहरातील खुलेआम सुरू असलेले अवैध धंदे तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे सुत्रांनी माहिती दिली, दौंड शहरातील बेकायदेशीर व अवैध धंदे चालवणारे महाठकांचे धाबे दणाणले असल्याची कुजबुज आहे,
दौंड पोलीस स्टेशन येथे नविन पोलीस निरीक्षक मा चंद्रशेखर यादव हे आले असल्याने अवैध धंदे बंद झाले असल्याची चर्चा शहरात सुरू आहे,
राज्यातील परिस्थिती पाहता दौंड शहरातील कायदा व सुव्यवस्थेला गाल बोट लागू नये याची दक्षता घेऊन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाच्या वतीने केला जात असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे,
दौंड तालुका पूर्व भागात दौंड शहर पोलीस स्टेशन आहे तर पश्चिम भागात यवत पोलीस स्टेशनचा विस्तार आहे, दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे ग्रामीण भागात देखील परिस्थिती बिकट आहे, वास्तविक पाहता धगीचा डोंब कधी होईल हे मात्र सांगता येत नाही, कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांची संख्या अधिक दिसून येत असल्याची नागरिकांमध्ये (घुमछाक) चर्चा आहे,
यवत पोलीस स्टेशन येथिल पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांची ही बदली झाल्याने त्यांच्या जागेवर नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक देशमुख साहेब यांची वर्णी लागताच, यवत पोलीस स्टेशन हद्दीतील यवत, भांडगाव खोर खुटबाव राहु, चौफुला केडगाव, पाटस, या भागातील बेकायदेशीर व खुलेआम सुरू असलेले कल्याण मुंबई मटका स्वरट जुगार तसेच हॉटेल ढाब्यांवरील वेश्या व्यवसाय देशी विदेशी गावठी हातभट्टी दारु विक्री हे अनेक दिवसांपासून खुलेआम सुरू असलेले अवैध धंदे काल पासून अचानक बंद झाल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे, हि कारवाई कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आहे ? की फक्त सुरुवातीला दहशत निर्माण करण्यासाठी आहे, असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांमधून (घुमछाक) चर्चा केली जात आहे,
दौंड शहर व ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, तत्पूर्वी पोलीस प्रशासनाने घेतलेली भूमिका कौतुकास्पद असल्याचे बोलले जात आहे,. दौंड शहर व यवत पोलीस स्टेशन येथे आलेले नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक अधिकारी आपले कर्तव्य बसवण्याचा प्रयत्न करत असतात, अशी ही (घुमछाक) चर्चा नागरिकांमध्ये होत आहे, या पार्श्वभूमीवर दौंड शहर पोलीस स्टेशन व यवत पोलीस स्टेशन हद्दीतील बेकायदेशीर अवैध धंदे चालकांची घाकघुकी वाढली असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे,
दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव साहेब, आणि यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देशमुख साहेब यांच्या कर्तव्या बाबत दौंड शहर व ग्रामीण भागातील सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील नागरीकांचे तसेच गाव कारभारी आणि सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे, येणाऱ्या पुढील काळात कर्तव्य समोर आल्या शिवाय राहणार नाही, अशी अनेक नागरिकांची धारणा दिसून येत आहे,
वाचक क्रमांक :