दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीतील आरोपीला दौंड पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आरोपीवर अनेक गुन्हे दाखल आहेत

By : Polticalface Team ,06-02-2024

दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीतील आरोपीला दौंड पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आरोपीवर अनेक गुन्हे दाखल आहेत

दौंड( प्रतिनिधी )घराचा दरवाजा तोडून रात्री मोबाईल आणि रोकड, पाकीटे वैगरे मारहाण करून बळजबरीने घेऊन जाणाऱ्या एका सराईत टोळीतील आरोपीला दौंडच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.अजय प्रकाश राठोड (रा.गिरीम ता. दौंड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

       याबाबत सविस्तर माहिती अशी, दि.६ रोजी पहाटे अडीच वाजता कुरकुंभ एमआयडीसीमध्ये काम करणारे परप्रांतीय मजूर आपल्या राहते घरी झोपले असताना पाच इसमांनी येऊन दरवाजाला धडका देऊन घरात जाऊन दोन मोबाईल, सहा हजार रोकड व पाकिटे असा 56 हजारांचा माल मारहाण करून जबरीने घेऊन गेले. याबाबत आशिष रमेश प्रजापती यांनी दौंड पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली होती.त्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीसांना तपासाबाबत सूचना दिल्या.गोपनीय बातमीदाराच्या माहितीवरून गुन्हातील एक आरोपी नामे अजय प्रकाश राठोड (रा.गिरिम) दौंड पोलिसांनी शिताफीने गिरीम गावच्या हद्दीमध्ये आपल्या ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता गुन्ह्यात चोरून नेलेल्या वस्तू त्यामध्ये २० हजार रू. किमतीचा आयफोन मोबाईल मिळून आला. फरार असलेल्या अन्य आरोपींचा शोध दौंड पोलीस ठाण्याचे अंमलदार करीत आहेत.

   ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, पोलिस अंमलदार पोलीस हवालदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, पोलीस नाईक विशाल जावळे, आदेश राऊत पोलीस कॉन्स्टेबल अमोल देवकाते आदींनी केली आहेत.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी