रमाईचे कार्य दीपस्तंभा सारखे - डॉ.प्रा. प्रकाश साळवे
By : Polticalface Team ,09-02-2024
श्रीगोंदा प्रतिनिधी :त्यागमूर्ती माता रमाई चे कार्य हे आंबेडकरी चळवळीमध्ये दीपस्तंभा सारखे आहे असे प्रतिपादन महाराजा जीवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे यांनी केले ते राहुल विद्यार्थी वसतिगृह श्रीगोंदा येथे रमाई जयंती निमित्त कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बाबासाहेब घोडके होते. ते पुढे म्हणाले की रमाईने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्यभर साथ दिली बाबासाहेब परदेशामध्ये शिक्षण घेत असताना आपल्या मुलांना सांभाळले त्यापैकी त्यांची चार अपत्य केवळ पैशा अभावी मरण पावली. बाबासाहेबांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये म्हणून ही बातमी रमाईने बाबासाहेबांना कळवले सुद्धा नाही. यशवंत हा एकुलता एक मुलगा जिवंत राहिला . बाबासाहेबांच्या जीवनामध्ये माता रमाई आलीच नसती तर कदाचित लाखो लोकांचा उद्धार झालाच नसता . आजच्या काळातील सुशिक्षित विद्यार्थ्यांनी रमाईच्या त्यागाची आठवण ठेवून रमाईचा उर्वरित इतिहास जनतेसमोर आणावा असेही त्यांनी सांगितले . रमाई जयंती निमित्त विद्यार्थ्यांमध्ये वाचन चळवळीची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी 3000 रू पुस्तक खरेदी साठी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक सतीश ओहोळ केली तर आभार चैतन्य गायकवाड यांनी मानले
वाचक क्रमांक :