लग्नाला एकवर्ष पूर्ण होण्या अगोदर मृतदेह राहत्या घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला.
By : Polticalface Team ,Sun Dec 12 2021 13:41:20 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनिधी: वर्षापूर्वी लग्न होवून सुखी संसाराची एक वर्षे पूर्ण होण्या अगोदरच सुशिक्षित तरुण मुलगी पुजा अतुल मोरे( वय वर्षे २२) राहणार अरणगाव दुमाला ता.श्रीगोंदे जि.अ.नगर हिचा रहात्या घरात अर्धनग्न मृतदेह फॕनला लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने पती अतुल बाळासाहेब मोरे (वय२७),सासरा बाळासाहेब त्रिंबक मोरे(वय५२) राहणार .अरणगाव या दोघा बापलेकांना पोलिसांनी अटक केली आहे.परंतु तिची हत्या कि आत्महत्या याची बेलवंडी पोलिसांनी सखोल चौकशी करुन दोषी सर्व आरोपीनां अटक करावी अशी मागणी मुलीचे वडील संजय बापु दिवटे यांनी केली आहे.
सविस्तर माहिती अशी कि श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला येथील रहिवासी पुजा संजय दिवटे( माहेरचे नाव) हिचा गावातीलच अतुल बाळासाहेब मोरे यांच्याशी १९ डिसेंबर २०२० रोजी एक वर्षापूर्वी विवाह झाला होता लग्नाला एक वर्षे पूर्ण होत नाही. तोच तुझ्या माहेरच्या लोकांनी आम्हांला काही दिले नाही. आता घरात चारचाकी गाडी घेण्यासाठी किमान दिड लाख रुपये तरी घेऊन ये असे म्हणत घरातील सासु,सासरे,आणि नंनद ह्या तिघाकडून पुजाचा सासरी दररोज मानसिक व शारीरिक छळ होत होता. हा त्रास मयत पुजा माहेरी आईवडील व पती अतुल यांना तोंडी व मोबाईल मेसेज करुन सांगत होती. तेव्हा घटना घडण्याच्या दोन दिवस अगोदर मुलीचे वडील संजय दिवटे यांनी गावातील काही पंच म्हणून मध्यस्थी लोकांना घेऊन सासरच्या लोकांना समजुन सांगितले कि माझी आर्थिक परिस्थिती नाजुक आहे. शेतातील पिक गेल्यानंतर मी पैशाची मदत करेल पण पैशासाठी मुलीला त्रास देऊ नका. यावर सासरचे लोक थांबले पण पुजाचा त्रास काही कमी झाला नाही.माहेरी शिक्षण पूर्ण झाले नाही, म्हणून पुजा सासरी सुध्दा काॕम्प्युटर इंजिनियरींगचे शिक्षण घेत होती. पण दि.८ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी साडे दहा वाजता पुजाचा मृतदेह सासरी घरातील रहात्या घरी फॕनला लटकलेल्या अवस्थेत सापडला त्यावेळी घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाऊ संदीप दिवटे,चुलते अशोक दिवटे,वडील संजय दिवटे ह्या माहेरच्या लोकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी पंचनामा करुण मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात पाठविला तेथे डाॕक्टरांसमोर तपासणी करताना मयत पुजाच्या अंगावर पाठिवर मारलेल्या खुणा दोन्ही गुडघे सुजलेले आढळून आल्याचे प्रत्यक्षदर्शी मुलीची मावशी स्वाती लक्ष्मण ढवळे यांनी सांगितले. शवविच्छेन झाल्यानंतर रात्री साडेआठ वाजता अंत्यविधी करण्यात आला त्यावेळी अंत्यविधीला सासरचे एकही व्यक्ती म्हणजे पुजाचे पती अतुल,सह सासु,सासरे,ननंद हजर का राहिले नाही.त्यावेळी माहेरच्या नातेवाईकांनी पुजावर अंत्यसंस्कार केले. यावेळी सर्व नातेवाईक लोक आक्रमक झाल्यानंतर बेलवंडी पोलिसांनी फक्त पती अतुल मोरे व सासरे बाळासाहेब मोरे, सासु वैशाली बाळासाहेब मोरे,ननंद मोहिणी मधूकर ढोले. यांच्यावर गुन्हा दाखल करुन फक्त दोघांनाच अटक केली. पण सासु आणि नंनद यांना अटक का झाली नाही. माझी मुलगी आत्महत्या करणारी नाही. तिला सासरच्या लोकांनी छळ करुण मारले व नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मोबाईल फोडून तिचा मृतदेह फासावर अर्धनग्न अवस्थेत लटकविला आहे. असा आरोप भाऊ संदिप दिवटे यांनी केला आहे. पुढील तपास बेलवंडी पोलिस करित आहे.
चौकटः माझी बहिण आत्महत्या करणार नाही.
माझी बहिण सुशिक्षित होती. तिला शिक्षणाची आवड होती. म्हणून माहेरी शिक्षण पूर्ण झाले नाही,म्हणून ती सासरी अभ्यास करुण काॕम्प्युटर इंजिनियरिंगच शिक्षण घेत होती. तिने माझ्या आईला व आत्यांला सांगितले होते की पती अतुल मोरेचे बाहेर अनैतिक संबंध आहेत. त्यामुळे माझा सासरच्या लोकांकडून मानसिक व शारीरिक छळ होतोय, म्हणून पोलिसांनी सर्व आरोपीनां अटक करुण सत्य परिस्थिती समोर आणून माझ्या बहिणीला न्याय द्यावा- संदीप संजय दिवटे मयत पुजाचा भाऊ
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.