मोठ्या प्रमाणात विक्रीत साठी चाललेला गुटखा पकडला श्रीगोंदा पोलिसांची कारवाई.
By : Polticalface Team ,Sun Dec 12 2021 13:45:56 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनिधी: 10/12/2021 रोजी 7.20 वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा फॅक्टरी ते ढोकराई फाट्याकडे जाणाऱ्या रोड वर प्राथमिक शाळेसमोर मारुती सुझुकी स्विफ्ट कार नंबर एम. एच.12 ई.टी. 2136 या गाडीतून विनापरवाना बेकायदा हिरा पान मसाला, विमल पान मसाला, तंबाखू महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या नाश कारक तंबाखू व पानमसाला ह्या त्यांचे निळ्या रंगाच्या सुझुकी कंपनीच्या शिफ्ट कार नंबर एम. एच. 12 ई. टी. 2136 मध्ये अन्नपदार्थ हे मानवी आरोग्यास हानिकारक आहे. याची जाणीव असताना विक्री करण्याचे उद्देशाने एकूण रुपये 235148 किंमतीचा (त्यात मारुती सुझुकी स्विफ्ट कार नं एम.एच.12 ई. टी.2136) वाहतूक करताना व जवळ बाळगताना मिळून आला असल्यामुळे 10/12/2021 रोजी 9.06 वा. गुन्हा रजिस्टर नंबर व कलम 0838/2021 भा.द.वि क 328.188.272.273 सह अन्नसुरक्षा व मानके कायदा 2006 कलम 59.26(2)(IV) प्रमाणे पोलीस कॉन्स्टेबल/551 सचिन संभाजी मस्के नेमणूक श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तेजस दादासाहेब ढमे वय 20 वर्ष राहणार श्रीगोंदा फॅक्टरी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचक क्रमांक :