By : Polticalface Team ,09-02-2024
येणाऱ्या काळात महाराष्ट्रात आंबेडकर सरकार निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजकुमार यांनी बोलताना सांगितले महाराष्ट्र राज्यात बेकारी बेरोजगारी भूकबळी वाढत चालली असून हुकूमशाही कडे वाटचाल चालू आहे, त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना साथ द्या त्यांचे हात बळकट करा असे प्रतिपादन केले, वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष राजकुमार, यांनी सांगितले.
या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाडले, जि.महासचिव सतीश साळवे, जिल्हा कार्यकारणी तसेच दौंड ता.अध्यक्ष अश्विन वाघमारे, ता उपाध्यक्ष रमेश तांबे, ता सचिव अजिंक्य गायकवाड, मा.अविनाश गायकवाड (गणअध्यक्ष), ता. महासचिव संजय जाधव, ता उपाध्यक्ष अनिकेत भागवत. ता.कार्यकारणी. दौंड शहर महासचिव अक्षय भाऊ शिखरे, अनिकेत जाधव, चेतन माने, विकास पवार, शुभम वानखेडे, निलेश मिसाळ, करण खांडे, खोरवडी ग्राम शाखा पदाधिकारी भाऊसो सकट, पाटसचे युवा कार्यकर्ते प्रणय काकडे वरवंडचे ता.सचिव युवराज दामोदरे, रोहित रणधीर भांडगाव चे ग्रामशाखा अध्यक्ष प्रमोद कांबळे, (बोरीभडक) आदिनाथ सरोदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहुन शाखा उद्घाटन कार्यक्रम मोठ्या उत्साहात डीजेच्या दणक्यात व फटाक्यांच्या आतिषबाजीत पार पडला.