By : Polticalface Team ,11-02-2024
आज नयनी देखीयला अमृताचा सोहळा...!
कवी- कृष्णा घोलप
----------------------
ज्ञान विज्ञानाचा गंध पसरला आगळा..
आज नयनी देखीयला अमृताचा सोहळा..!
अमृताने नाहला स्थापनेचा दिस..
आनंद अवघ्या विद्यापीठास..
चोहिकडे दाटला ज्ञानरंग वेगळा...
आज नयनी देखीयला अमृताचा सोहळा..!
नामविस्तार जाहला सावित्रीच्या नावे..
कार्य त्या माऊलीचे नित्य नित्य आठवे..
शिक्षणाची फुले अन् यश कीर्तीच्या माळा...
आज नयनी देखीयला अमृताचा सोहळा..!
वृक्षवल्ली सोयरे ऐसा परिसर..
ज्ञानसाधनेलागी असे जयकर..
परिश्रमाने फुलतो येथे विद्येचा मळा..
आज नयनी देखीयला अमृताचा सोहळा..!
गौरवशाली कार्य वृद्धिंगत होय..
नुतन पहाट आज नविन अध्याय..
अनावर वाचा होतसे वर्णू किती वेळा..
आज नयनी देखीयला अमृताचा सोहळा..!
कवी- कृष्णा भगवान घोलप
(एम.ए. ईंग्रजी प्रथम वर्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे)
---
वाचक क्रमांक :