By : Polticalface Team ,14-02-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड दौंड ता १४ फेब्रुवारी २०२४ दौंड तालुक्यातील यवत केडगाव चौफुला वरवंड पाटस या गावांचा बंद ला प्रतिसाद मराठा कुणबी बांधवांनी गाव बंद ठेवून प्रस्थापित सरकार विरुद्ध केला निषेध व्यक्त
मराठा कुणबी आरक्षण आंतरवली सराटी येथे सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे उपोषणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रातील शहर व ग्रामीण भागात दिसून येत आहे
मराठा कुणबी समाजाच्या वतीने गाव बंद चे आव्हान करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील मौजे यवत तालुका दौंड जिल्हा पुणे येथील व्यवसाय उद्योग करणाऱ्या व्यापारी व दुकानदारांनी सकारात्मक भूमिका घेऊन यवत गाव शंभर टक्के बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता मराठा कुणबी आरक्षण संदर्भात उद्योग व्यवसाय करणाऱ्या व्यापारी बांधवांनी स्वखुशीने गाव बंद ठेवल्याने गावातील मराठा कुणबी समाज बांधवांनी व्यापारी दुकानदारांचे आभार व्यक्त केले तसेच प्रस्थापित सरकार विरुद्ध नाराजी व्यक्त केली
पुणे सोलापूर महामार्गावरील असलेल्या गाव बंद मध्ये यवत खामगाव फाटा कासुर्डी फाटा, राहु केडगाव चौफुला वरवंड पाटस या गावांचा समावेश असल्याचे दिसून आले
मराठा कुणबी आरक्षण संदर्भात प्रस्थापित सरकारने सगे सोयरे व नातलगांचा मराठा कुणबी मध्ये समावेश करण्या बाबत तत्काळ निर्णय घ्यावा अशी अनेक मराठा कुणबी समाजातील नागरिकांनी बोलताना सांगत आपली नाराजी व्यक्त करण्यात आली आहे यवत केडगाव चौफुला वरवंड पाटस तसेच दौंड तालुक्यातील अनेक ठिकाणी कडकडीत गाव बंद असल्याचे दिसून आले
वाचक क्रमांक :