By : Polticalface Team ,16-02-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता १६ फेब्रुवारी २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे, येथील पुणे सोलापूर महामार्गावर मराठा कुणबी समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, अंतरवली सराटी येथे मराठा कुणबी आरक्षण संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरु केले आहे.
राज्य शासनाने मराठा कुणबी आरक्षण बाबत काढलेल्या अधिसूचनेची अंमल बजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी दि,१६ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्रा राज्य भरात चक्का जाम आंदोलनाची हाक देण्यात आली होती, या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील मौजे यवत येथे पुणे सोलापूर महामार्गावर बैलगाड्या आडव्या लावून रास्ता रोको चक्का जाम तब्बल अर्धा तासांपेक्षा अधिक वेळ वाहतूक कोंडी करत आंदोलन करण्यात आले होते,
यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील भुलेश्वर फाटा येथे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला समर्थन देण्यासाठी मराठा कुणबी समाजातील युवा तरुण बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता, भोर शिरूर व पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर दोन्हीं बाजूने बैलगाड्या आडव्या लावून अर्धा तासांपेक्षा अधिक वेळ रस्ता रोको आंदोलन करुन वाहतूक कोंडी करण्यात आली होती.
या प्रसंगी मनोज जरंगे पाटील यांच्या मागणीला समर्थन देऊन प्रस्थापित सरकार विरुद्ध जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या सात दिवसापासून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसले आहेत, त्यांची प्रकृती अतिशय गंभीर असून देखील मराठा कुणबी आरक्षण बाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेत नसल्याने समाजाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक असून समाज बांधवांचा लढा देत आहेत, त्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील जिल्हा तालुका गाव स्तरावर ठिक ठिकाणी आंदोलने करून प्रस्थापित सरकार विरुद्ध नाराजी व्यक्त केली जात आहे,
याच पार्श्वभूमीवर यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील सकल मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ पुणे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
यवत परीसरातील युवा तरुणांनी भाजप सरकार विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त केला, सरकारने अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाची दखल घेऊन मराठा कुणबी आरक्षणाचा तीढा तत्काळ सोडवण्याचा प्रयत्न करावा, अशी भावना आंदोलन कर्त्यांनी व्यक्त केली, तसेच राज्य शासनाने मराठा कुणबी आरक्षण संदर्भात निर्णय न घेतल्यास होणाऱ्या परिणामास राज्य सरकार जबाबदार राहील असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलकांनी सुमारे अर्ध्या तासा पेक्षा अधिक वेळ दोन्ही बाजूने रस्ता अडवून धरला होता, त्यामुळे महामार्गावर दोन कि मी अंतरा पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी करण्यात आली होती.
या वेळी दौंड तहसीलदार यांच्या वतीने यवत येथील मंडल अधिकारी
मा अर्चना वनवे यांनी आंदोलन कर्त्यांचे निवेदन स्वीकारले तसेच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी मराठा कुणबी समाज बांधवांच्या भावना लक्षात घेऊन सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करत आंदोलकांशी चर्चा करून, पुणे सोलापूर महामार्गावरील रस्ता रोको आंदोलन स्थगित केले, या प्रसंगी यवत पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक कोंडी तत्काळ सुरळीत करण्यात आली.
वाचक क्रमांक :