शरद पवारसाहेब आधुनिक भारताचे शिल्पकार ,रामदास पोकळे
By : Polticalface Team ,Mon Dec 13 2021 18:04:32 GMT+0530 (India Standard Time)
लिंपणगांव प्रतिनिधी:
शरद पवारसाहेब हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत असे प्रतिपादन ,रामदास पोकळे यांनी केले ते न्यू इंग्लिश स्कूल शिंदे या विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवसा निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रूपचंद (आण्णा) घालमे होते.या वेळी मंचकावर मुख्याध्यापक श्री. गोसावी एम. व्ही. बाळासाहेब घालमे, श्रीहरी घालमे इ.मान्यवर उपस्थित होते. पोकळे पुढे काटेवाडी सारख्या ग्रामिन भागात जन्म घेतलेल्या साहेबांनी आपल्या इच्छा शक्तीच्या बळावर राजकीय ,सामाजिक , आर्थिक शैक्षणिक, क्रिडा श्रेत्रात भरीव कार्य केले. त्यांच्या या सर्व करायमुळे ते आधुनिक भारताचे शिल्पकार ठरत आहेत. यावेळी विद्यालयात निबंध स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,भाषण स्पर्धा चे आयोजन केले होते.या सर्व स्पर्धामधे विद्यार्थीनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती काळे बी.पी. यांनी केले सूत्रसंचालन श्री.सोलंकर के.एम . तर आभार श्रीमती जगदाळे आर . जी. यांनी मानलेप्रदर्शन
वाचक क्रमांक :