रोहयो मंत्र्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन , जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय आधिका-यांवर कारवाई करा

By : Polticalface Team ,Mon Dec 13 2021 18:12:25 GMT+0530 (India Standard Time)

रोहयो मंत्र्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन ,  जिल्ह्यातील  वरिष्ठ प्रशासकीय आधिका-यांवर कारवाई करा बीड प्रतिनिधी: जिल्ह्य़ातील मनरेगा अंतर्गत विविध कामातील गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करण्यास जाणीवपुर्वक दफ्तर दिरंगाई करत असल्याबद्दल जिल्हाधिकारी बीड, उपजिल्हाधिकारी रोहयो , मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद उपमुख्य कार्यकारी आधिकारी( पंचायत )जिल्हापरिषद ब तसेच गटविकास आधिकारी नरेगा कक्ष यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.१३ डिसेंबर सोमवार रोजी ना. संदिपान भुमरे, रोहयो मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या औरंगाबाद येथील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे,या आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, सामाजिक कार्यकर्ते संदिप जाधव, अशोक कातखडे, मोहम्मद मोईज्जोदीन, सय्यद आबेद, शेख मुबीन, आदि सहभागी आहेत. ना.संदिपान भुमरे, रोहयो मंत्री दौ-यावर असल्याने त्यांच्या कार्यालयामार्फत निवेदन देण्यात आले. सविस्तर माहीतीस्तव:- दोन वर्षापासून केज तालुक्यातील विविध गावातील मनरेगा अंतर्गत गैरव्यवहार प्रकरणातील संबधित दोषींवर गुन्हे दाखल करण्यास जाणीवपुर्वक विलंब केला जात असून चौकशीच्या समिती नेमण्याच्या नावाखाली तसेच तांत्रिक कारणे दाखवून दफ्तर दिरंगाई करण्यात येत असून ग्रामसेवक संघटनांच्या दबावाखाली जिल्हाप्रशासनातील वरिष्ठ आधिकारी गुन्हे दाखल करण्यास जाणीवपुर्वक विलंब करत आहेत त्यामुळेच संबधित प्रकरणात दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल वरिष्ठ आधिकारी तसेच चौकशी समितीतील आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी त्यासाठी स्वतंत्र उच्च स्तरीय कमिटीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. आणि मौजे. शेकटा ता.गेवराई येथील मनरेगा अंतर्गत गैरव्यवहार प्रकरणात मयतांना रोहयो मजुर दाखवून अपहार प्रकरणात प्रशासकीय आधिकारी भ्रष्टाचार दडपण्याचाच प्रयत्न करत असून गुन्हे दाखल करण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ करणे तसेच मौजे. मोरगांव ता.जि.बीड येथील मनरेगा अंतर्गत गैरव्यवहार प्रकरणात रोहयो कार्यालयातुन संचिकाच गायब प्रकरणात तसेच मौजे गोलंग्री ता.जि.बीड येथील बांधबंदीस्ती अपहार प्रकरणात अपहारीत रक्कम वसूल करण्यास दिरंगाई केल्याबद्दल तसेच वारंवार निवेदन देऊन व कामबंद आंदोलनाची धमकी देऊन बीड जिल्हाप्रशासनावर दबाव आणून वर्तमानपत्रात जिल्हाप्रशासनाची बदनामी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जि.बीड जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हासरचिटणीस यांच्यावर महाराष्ट्र जिल्हापरिषद सेवा (शिस्त व अपिल)१९६४ मधिल तरतुदीनुसार व अनुषंगिक नियमांअंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी बीड यांनी देऊन सुद्धा अद्याप कारवाई न केल्याबद्दल संबधित जबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी आदि मागण्या करण्यात आलेल्या आहेत. डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर मो. नं.८१८०९२७५७२
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद