By : Polticalface Team ,23-02-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २३ फेब्रुवारी २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व श्री महालक्ष्मी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात होणार असल्याचे सांगितले, दरवर्षी प्रमाणे श्री काळभैरवनाथ व महालक्ष्मी यात्रा उत्सव शनिवार- रविवार दि २४ - २५ फेब्रुवारी २०२४ रोजी यात्रा उत्सव श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व इतर ग्राम देवस्थान कमिटीच्या वतीने साजरा करीत असल्याचे त्यांनी सांगितले,
यवत तालुका दौंड जिल्हा पुणे येथील श्री काळभैरवनाथ व महालक्ष्मी उत्सव यात्रेच्या निमित्ताने प्रमुख कार्यक्रम शनिवार दि २४ रोजी सकाळी ५ ते ६ श्री काळभैरवनाथांची महापूजा, ६ ते ९ देवाला पाणी घालणे ९ ते ११ श्री काळभैरवनाथांना पोशाख ११ ते ६ दंडवत नैवेद्य साय,६ ते ८ नाथांच्या काठ्यांची पारंपारिक वाद्याच्या गजरात जंगी मिरवणूक तसेच रात्री ९ ते १२ श्री काळभैरवनाथांची पालखी छबिना मिरवणूक ढोल ताशा लेझीम पथकाच्या पारंपारिक पद्धतीने व फटाक्यांच्या उत्कृष्ट आतिश बाजीत मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे,
( शनिवार दि, २४ /०२ /२०२४ रोजी रात्री संगीताची राणी, मंगला बनसोडे सह नितीन कुमार बनसोडे (करवडीकर) यांचा लोकनाट्य तमाशा व रविवारी सकाळी हजऱ्या मोठ्या उत्साहात होणार असल्याचे देवस्थान ट्रस्ट समिती यांनी सांगितले.
रविवार दि २५ /०२/२०२४ रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ७ पर्यंत नामांकित पैलवानांचा जंगी कुस्ती आखाडा होणार आहे, )
श्री काळभैरवनाथ व महालक्ष्मी यात्रा उत्सवाच्या निमित्ताने जिल्हा व तालुकास्तरावर असलेल्या नामांकित ढोल ताशा लेझीम पथकांनी तसेच पंचक्रोशीतील भजनी मंडळांनी व विविध सांस्कृतिक खेळ कला पथकांनी श्री काळभैरवनाथ पालखी छबिण्यात सहभाग घेऊन शोभा वाढवावी, यावर्षी श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट समितीच्या वतीने पालखी छबिण्यात सहभागी झालेल्या ढोल ताशा लेझीम तसेच विविध सांस्कृतिक उत्कृष्ट ढोल ताशा लेझीम खेळ पथकांचे १ ते ३ क्रमांक निवडण्यात येणार असून त्यांना जास्तीत जास्त इनाम देण्यात येणार असल्याचे श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट समितीच्या वतीने सांगण्यात आले असून श्री काळभैरवनाथ व श्री महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट समस्त ग्रामस्थ मंडळ यवत यांच्या वतीने करण्यात आले आहे.
वाचक क्रमांक :