पत्रकाराच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अपघात , ग्रामस्थांकडून कौतुकाची थाप
By : Polticalface Team ,Mon Dec 13 2021 21:44:37 GMT+0530 (India Standard Time)
बारामती प्रतिनिधी (अमोल गायकवाड): वडगाव निंबाळकर(ता.बारामती)येथील वडगाव निंबाळकर-मुढाळे रस्त्यावरील ना दुरुस्त चेंबरची बातमी नुकतेच सा.शाईनामा या वृत्तपत्राने प्रसिद्धी केली होती.या बातमीची थेट दखल घेत आज वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीने चेंबर दुरुस्त करण्यात सुरुवात केली आहे.
वडगाव-मुढाळे रस्त्यावरील कित्येक दिवसापासून हा चेंबर नादुरुस्त होता.हा चेंबर रस्त्यांच्या मध्यभागी असल्याने मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती.परंतु या बातमीचे वृत्त प्रसिद्ध होताच लेट पण थेट दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाकडून तत्काळ चेंबर दुरुस्त करण्यास सुरुवात केल्याने मोठा अनर्थ टळला.
या चेंबरचे काम चालु होताच वडगाव निंबाळकर ग्रामस्थांकडून सा.शाईनामाचे आभार व्यक्त केले.जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळेपासून हा चेंबर 50 मीटर अंतरावर होता.त्यामुळे या ठीकाणी मोठा घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.हा चेंबर मृत्यूचा सापळा बनला होता.चेंबरचे काम चालू झाल्याने ग्रामस्थ व या रस्त्यावरून ये जा करणाऱ्यां लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.या चेंबरची दुरुस्ती करावी म्हणून बहुजन हक्क परिषद वडगाव निंबाळकर यांच्या मार्फत पाठपुरावा करण्यात आला होता.
चौकट-वडगाव-मुढाळे रस्त्यावरील हा चेंबर खऱ्या अर्थाने मृत्यूचा सापळा बनला होता.परंतु सा.शाईनामा व त्यांचे पत्रकार अमोल गायकवाड यांनी वृत्त प्रसिद्ध करून मोठा घातपात होण्याला आळा घातला आहे. त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.
पै.नानासाहेब मदने
(युवक अध्यक्ष बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य)
वाचक क्रमांक :