शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ऊस तोडणी कामगारांना ब्लँकेट वाटप

By : Polticalface Team ,Mon Dec 13 2021 22:09:50 GMT+0530 (India Standard Time)

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ऊस तोडणी कामगारांना ब्लँकेट वाटप पाथर्डी प्रतिनिधी: देशाचा मूळ इतिहास बाजूला करून नव्या पिढीपुढे चुकीचा इतिहास मांडला जात आहे.ज्या देशाचा इतिहास विसरवला जातो, त्या देशाचे भवितव्य धोक्यात असल्याचे मानले जाते.आणि हाच धोका लक्षात आल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार नव्या पिढीच्या भवितव्यासाठी आजही सक्रिया असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अॕड.प्रतापराव ढाकणे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ऊस तोडणी कामगारांना ब्लँकेट वाटप तसेच मुंबईहून प्रसारित झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त जमलेल्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. हिंद वसतीगृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन झाले. यावेळी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे,नगरसेवक बंडू बोरूडे,महिला तालुकाध्यक्षा सविता भापकर,जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे, दिगंबर गाडे, किरण शेटे, वैभव दहिफळे, मुरली दहिफळे, माजी पं.स.सदस्य व्हि.टी.खेडकर, बन्सी आठरे, बाळासाहेब घुले, अनिल ढाकणे, हुमायून आतार, शहराध्यक्ष योगेश रासने, अक्रम आतार, सोमनाथ टेके, उषा जायभाये, रत्नमाला उदमले, माजी जि.प.सदस्या योगिता राजळे, मनिषा ढाकणे, देवा पवार, राजेंद्र बोरूडे, जालिंदर वामन, गहिनीनाथ शिरसाट, युवकचे तालुकाध्यक्ष महारूद्र कीर्तने, चंद्रकांत भापकर, आरती निऱ्हाळी, आतिष निऱ्हाळी, बाळासाहेब गर्जे आदी उपस्थित होते. पुढे ढाकणे बोलतांना म्हणाले, महात्मा गांधींच्या विचारांची गरज आज देशाला आहे. त्याच विचारांना धक्का देण्याचे काम काही शक्तींकडून होत असल्याने शरद पवार याविरोधात लढत आहेत. महाराष्ट्राची आजची प्रगती ही केवळ पवार साहेबांच्या दूरदृष्टीचा परिणाम असून सर्व क्षेत्रे व समाजातील सर्व घटकांसाठी त्यांच्याकडून मागील पन्नास वर्षात काम झालेले आहे.सर्व समाजात एकता व समता या शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारसरणीच्या आधारावर पवारांनी महाराष्ट्र बांधला असून, यासाठी आपण सर्वांनी त्यांना साथ देणे गरजेचे आहे, अन्यथा नव्यापिढीपुढे चुकीचे संदर्भ मांडून देशाची वाटचाल वेगळ्या दिशेनने होईल. येत्या सर्व निवडणूकीत जनतेने पुरोगामी विचारांशी बांधिलकी असणाऱ्यांना साथ द्यावी व वेगळे मनसुबे बाळगून असणाऱ्यांना धडा शिकवावा. येत्या काही दिवसांत पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासाठी निवासी शिबीराचे आयोजन करणार असून त्यांचे वैचारिक मोट पक्की केली जाईल. प्रास्तविक तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी केले तर आभार किरण खेडकर यांनी मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.