राजेंद्र प्रसाद विद्यालयात एस एस सी परीक्षा केंद्र सुरळीत सुरू

By : Polticalface Team ,02-03-2024

राजेंद्र प्रसाद विद्यालयात एस एस सी परीक्षा केंद्र सुरळीत सुरू

     लिंपणगाव( प्रतिनिधी)- एस. एस. सी. बोर्ड पुणे यांच्यामार्फत घेण्यात येत असलेल्या इयत्ता दहावी मार्च 24 ची परीक्षा डॉ राजेंद्र प्रसाद विद्यालय पारगाव सुद्रिक या केंद्रात शुक्रवारी एक मार्च रोजी सुरळीत व चोख पोलीस बंदोबस्तात सुरू झाली. दरम्यान पहिल्या दिवशी मराठी विषयाचा पेपर असल्यामुळे या केंद्रावर सुसज्ज अशी बैठक व्यवस्था करण्यात आलेली असून, परीक्षार्थींना तणावमुक्त व शांततेच्या वातावरणात परीक्षेत प्रारंभ झाला अशी माहिती परीक्षा केंद्रसंचालिका श्रीमती अलकाताई दरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी अधिक माहिती देताना केंद्र संचालिका श्रीमती अलकाताई दरेकर यावेळी म्हणाल्या की, या परीक्षा केंद्रावर प्रामुख्याने सात शाळांचे विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून प्रविष्ट आहेत. या सर्व शाळांचे जवळपास 311 विद्यार्थी असून त्यामध्ये श्री व्यंकनाथ विद्यालय लोणी व्यंकनाथ तर घारगाव येथील दोन आश्रम शाळा, यशवंतराव चव्हाण विद्यालय घारगाव, तुळसाई माध्यमिक विद्यालय घोटवी, वडाळी माध्यमिक विद्यालय वडाळी, आणि डॉ राजेंद्र प्रसाद विद्यालय पारगाव सुद्रिक येथील विद्यार्थ्यांचा या केंद्रावर परीक्षार्थी म्हणून समावेश आहे.


        पारगाव सुद्रिक या एसएससी केंद्रावर एस एस सी परीक्षेचा मराठी विषयाचा एक मार्च रोजी पहिलाच पेपर परीक्षार्थींनी शासन नियमाच्या अधीन राहून शांततेच्या वातावरणामध्ये पार पडला. यावेळी केंद्र संचालिका म्हणून श्रीमती अलकाताई दरेकर तर उपकेंद्र संचालक म्हणून अशोक क्षीरसागर हे या परीक्षा केंद्रावर काम पाहत आहेत. याप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार न घडता पहिल्या दिवशी परीक्षा शांततामय वातावरणात पार पडली. दरम्यान परीक्षेच्या प्रारंभी दक्षता कमिटीने देखील परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी यावेळी स्कूल कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब जगताप, उपाध्यक्ष जनार्दन मोटे, सदस्य दीपक तारकुंडे, दिलीप शिंदे, अण्णासाहेब रेपाळे, शहाजी मडके, शहाजी हिरवे, सरपंचपती दत्तात्रय हिरवे, सुदाम खेतमाळीस आदी  दक्षता कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली.


    यावेळी पोलीस कॉन्स्टेबल समीर सय्यद, होमगार्ड श्री पुराणे, हिरडे सी एम, गोरखे व्हि डी यांनी या परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी