खुटबाव ते पिंपळगाव रोडवर. अल्टो कारमध्ये गावठी हातभट्टीची दारू. १ लाख ५८ हजार ७५० रु किंमतीचा मुद्देमाल जप्त. यवत पोलिसांनी बजावली कामगिरी.
By : Polticalface Team ,03-03-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ०३ मार्च २०२४ यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे पिंपळगाव ता दौंड जिल्हा पुणे गावचे हद्दीत खुटबाव ते पिंपळगाव मार्गी जाणाऱ्या रोडवर लाल रंगाची अल्टो कार नंबर एम एच १२ ए एफ २९७८ या मध्ये काळ्या रंगाच्या ३५ लिटर मापाचे एकुण ५ प्लास्टिकचे कॅन्डमध्ये गावठी हातभट्टीची तयार दारू घेऊन जात असताना आरोपी (बिसम अशोक नानावत) यास यवत पोलिसांनी पकडुन कामगिरी बजावली असल्याचे यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले.
गावठी हातभट्टी तयार दारु मानवी शरीरास नशाकारक व आपथ्यकारक असुन शरीरास त्रासदाय इजा होणारी जानीव असुनही त्याची विक्री करीता घेऊन जात असताना अल्टो कार वाहनासह मुद्देमाल मिळुन आला आहे.
सदर घटना दि ०२ मार्च २०२४ रोजी ३ वा जे सुमारास मौजे पिंपळगाव ता दौंड जिल्हा पुणे गावचे हद्दीत आवाळे वस्ती येथे खुटबाव ते पिंपळगाव मार्गी जाणाऱ्या रोडवर एका लाल रंगाची अल्टो कार मध्ये १७५ लिटर गावठी हातभट्टी तयार दारु मिळुन आली असल्याने यवत पोलीस स्टेशन येथे फिर्यादी अक्षय नामदेव यादव पो हवा नेमनुक यवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण. यांनी गु र नं २१६/२०२४ भा द वि क. ३२८ महाराष्ट्र दारुबंदी कायदा अधिनियम १९४९ कलम ६५ (क) अंन्वेय आरोपी बिसम अशोक नानावत वय ३५ वर्ष रा २२ फाटा केडगाव ता दौंड जिल्हा पुणे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
यामध्ये लाल रंगाची अल्टो कार नंबर एम एच १२ ए एफ २९७८ जु वा काळ्या रंगाचे ३५ लिटर मापाचे एकुण प्लास्टिकचे ५ कॅन्ड त्यामध्ये गावठी हातभट्टी १७५ लिटर तयार दारु एकुण १ लाख ५८ हजार ७५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे देशमुख यांनी सांगितले. दाखल अंमलदार पोलीस ना शिंदे पुढील तपास पोलीस ना इंगवले अंमलदार करीत आहेत.
वाचक क्रमांक :