हंगामी वसतिगृहा संदर्भात विद्यार्थी उपासमारीची तक्रार आल्यास कारवाई होणार, अजित पवार सीईओ
By : Polticalface Team ,Tue Dec 14 2021 13:07:38 GMT+0530 (India Standard Time)
जिल्हापरिषद बीड समग्र शिक्षा अभियान अंतर्गत २०२१-२२ करीता ऊसतोड मजुरांच्या मुलांचे स्थलांतर रोखण्यासाठी बीड जिल्ह्य़ात ३४८ हंगामी वसतिगृहांना मंजुरी देण्यात आल्यानंतर दिड महिना होऊन सुद्धा ११२वसतिगृहे सुरू करण्यात आली नसून मुलांची उपासमार होत असल्याने वसतिगृहाच्या आशेवर थांबलेले विद्यार्थी कारखान्याची वाट धरू लागले असून उर्वरीत वसतिगृहे तात्काळ सुरू करण्यात यावीत अन्यथा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलनाचा ईशारा सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अजित पवार तसेच जिल्हाधिकारी, गटशिक्षण आधिकारी यांना दिल्यानंतर अजित पवार यांनी
हंगामी वसतिगृहे चालवण्याची संपुर्ण जबाबदारी शाळाव्यवस्थापनाची, उपासमारीची तक्रार आल्यास कारवाई होणार:- अजित पवार, सीईओ जिल्हापरिषद बीड
___
अजित पवार मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांनी
हंगामी वसतिगृहास मंजुरी देऊनही वसतिगृह सुरू न केलेल्या ठीकाणी विद्यार्थ्यांची उपासमार होत असल्याबद्दल कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास संबधितांवर योग्य कारवाई करण्यात येईल असे सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
जिल्ह्यातील स्थलांतरीत पालकांच्या मुलांसाठी हंगामी वसतिगृहे सुरू करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांचेकडुन प्रस्ताव मागविण्यात आले असून पहिल्या टप्यात ३४८ हंगामी वसतिगृहांना तर दुस-या टप्यातील ४५ ,हंगामी वसतिगृहांना मान्यता देण्यात आलेली असून एकुण ३९३ हंगामी वसतिगृहास मान्यता देण्यात आली आहे.हंगामी वसतिगृह चालवण्याची संपुर्ण जबाबदारी ही शाळा व्यवस्थापनाची असल्याचे नमुद केले आहे.
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. नं.८१८०९२७५७२
वाचक क्रमांक :