यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे नांदुर गावचे हद्दीत पैलवान पान शॉप मागे. देशी विदेशी दारू विक्री अड्यावर. यवत पोलिसांचा छापा.
By : Polticalface Team ,04-03-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ०५ मार्च २०२४ दौंड तालुक्यातील मौजे नांदूर ता दौंड जिल्हा पुणे येथील फिल्डगार्ड कंपनी शेजारी पैलवान पान शॉप मागे देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या अड्यावर यवत पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली असल्याचे यवत पोलीसांनी सांगितले.
या बाबत सविस्तर माहिती अशी की यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे नांदूर गावाचे हद्दीत फिल्डगार्ड कंपनी शेजारी पैलवान पान शॉप मागे देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या अड्यावर यवत पोलिसांनी छापा टाकून दि०४/०३/२०२४ रोजी ३:१० वा जे सुमारास कारवाई केली.
फिर्यादी प्रमोद रमेश शिंदे. पोलिस नाईक. नेमणुक यवत पोलीस स्टेशन. यांच्या फिर्यादी वरून गु र नं २२५/२०२४. महाराष्ट्र दारुबंदी कायदा अधिनियम १९४९ कलम ६५ ( ई ) प्रमाणे आरोपी. कौशल्या सुनिल कोल्हे वय २३ वर्ष रा. नांदूर ता दौंड जिल्हा पुणे. हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाई मध्ये आरोपी कौशल्या सुनिल कोल्हे हिच्या ताब्यात असलेल्या देशी विदेशी दारूच्या सिलबंद बाटल्या व १८८५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जवळ बाळगुन लोकांना विक्री करीत असताना मिळुन आला आहे. त्यामध्ये टॅंगोपंच कंपनीच्या ९० मिली. मापाच्या २३ सिलबंद बाटल्या. प्रति की ३५ रुपये प्रमाणे एकुण ८०५ रुपये. तसेच रॉयल स्टॅग व्हिस्की कंपनीच्या ६ सिलबंद बाटल्या १८० मिली मापाच्या प्रति की १८० रुपये. असे एकुण (१८८५ ) रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून स्टेशन डायरी क्र.३६/२०२४ नोंद करण्यात आली आहे. यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार पो हवा वलेकर. पोलीस हवालदार भोर पुढील तपास करीत आहेत.
वाचक क्रमांक :