शिवरात्री कथा ही मानवी जीवनात परिवर्तन घडवून आणणारी कथा- ह भ प दत्तात्रय महाराज फरांदे
By : Polticalface Team ,09-03-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)-- महाशिवरात्र ही संपूर्ण देशामध्ये पवित्र शिवरात्र समजले जाते. या शिवरात्र कथेतून मानवी जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची मोठी ताकद असल्याचे गौरवदगार ज्येष्ठ कीर्तनकार ह भ प दत्तात्रय महाराज फरांदे यांनी लिंपणगाव येथे आयोजित कीर्तन सोहळ्यात व्यक्त केले.
लिंपणगाव तालुका श्रीगोंदा येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ कीर्तनकार फरांदे महाराजांची किर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित भाविकांसमोर बोलताना फरांदे महाराज पुढे म्हणाले की," शिवरात्री कथा ते ऐकते इच्छेने पावती सर्वकाही" या संत महाराजांच्या अभंगांमध्ये दुसऱ्या चरणामध्ये म्हटले आहे की, शिवरात्री ही पर्व काळ विशेष महत्त्व सांगताना फरांदे महाराज पत्रकारांशी महाशिवरात्रीचे महत्त्व या विषयावर संवाद साधताना म्हणाले की, शिवरात्रीची कथा लिहिली तो तालुका श्रीगोंदा गाव चांदगाव हे आहे. निश्चितच श्रीगोंदा तालुका हा संतांची पावनभूमी म्हणून परिचित आहे. या तालुक्यात अनेक थोर संत महात्म्यांचे पदस्पर्शाने पावन झालेले आहेत. त्यामुळे चांडगावकर व लिंपणगावकर हे देखील भाग्यवान आहेत. या गावांमध्ये प्रभू शंकराचे हेमाडपंती पुरातन कालीन मंदिर उभारले, तो काळ अत्यंत वैचारिक दृष्ट्या चिंतन करणार होता. या गावात मंदिर व उभारताना ऋषीमुनींनी देखील तपश्चर्या केली. आज ही वास्तू किती वर्षाची असेल? या वास्तूची बांधणी ही कोणत्या इंजिनिअरने केली असेल? हे सांगणे देखील तितकेच कठीण आहे. या मंदिरात देखील शंकर पार्वती व मुलगा गणेश यांचा पदस्पर्श झालेला आहे त्यामुळे लिंपणगाव हे देखील धार्मिक दृष्ट्या पवित्र गाव व जो या गावात जन्मला तो देखील धनवान व भाग्यवान समजला जातो. असे देखील महाराजांनी यावेळी पत्रकारांची बातचीत करताना सांगितले
पुढे बोलताना दत्तात्रय महाराज फरांदे म्हणाले की, निश्चितच महाशिवरात्रीचा उपवास किंवा एकादशी चे व्रत केल्यानंतर जीवन सुसह्य सुरक्षित व आनंदी राहते. महाशिवरात्री ही पर्वकाळ आहे. त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचा उपवास करून शिवरात्र कथा वाचावी त्यातून जीवनाचा सुखर मार्ग मिळतो लिंपणगावचे ग्रामस्थ व महिला या आपल्या ग्रामदैवताच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहतात. श्रावण महिन्यामध्ये देखील आठ दिवस सप्ताह सोहळा आयोजित करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासतात तो संदेश निश्चितच प्रेरणादायी आहे. जागृत देवस्थान म्हणून या ग्रामदैवतासाठी दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त यात्रा उत्सव साजरा करून आपला भक्तिमार्ग अखंड पुणे पुढे चालू ठेवला त्याबद्दल सर्व ग्रामस्थ व यात्रा कमिटीचे ह भ प फरांदे महाराज यांनी कौतुक केले आहे. यावेळी लिंपणगाव पंचक्रोशीसह तालुक्यातील भाविक भक्त या कीर्तन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :