सम्यक प्रज्ञा फाउंडेशन दौंड यांच्या विद्यमानाने दौंड शहरात सर्व धर्मीय वधु वर परिचय मेळावा संपन्न. १४८ वधू-वरांनी दर्शवली उपस्थिती. अंतरजातीय विवाह करण्याची देखिल तयारी.
By : Polticalface Team ,11-03-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १० मार्च २०२४ सम्यक प्रज्ञा फाउंडेशन संचलित वधु वर सूचक केंद्र दौंड यांच्या विद्यमानाने व कालकथित सुनंदा साहेबराव पोळ यांचे स्मरणार्थ दौंड शहरात सर्व धर्मीय वधु वर परिचय महामेळावा दि १० मार्च २०२४ रोजी गणेश हॉल रेल्वे जूनियर इन्स्टिट्यूट दौंड रेल्वे स्टेशन जवळ ता दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी मा पांडुरंग जी शेलार. कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
स्वराज्य रक्षक राजे छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर. माई रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून. सम्यक प्रज्ञा फाउंडेशन वधू वर परिचय मेळावा कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी आणि पालकांसह वधू वर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये बौद्ध समाजातील ९१ तरुण युवक आणि ३४ मुलींनी तसेच मराठा माळी धनगर परीट सर्व बहुजन समाजातील २३ अशा एकुण १४८ वधु वरांनी या परिचय मेळाव्यात सहभाग घेतला होता. यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर इंजिनियर. वकील प्रोफेसर. उच्च शिक्षित. पदवीधर. सरकारी. निमसरकारी. अधिकारी. कर्मचारी. शिक्षक. व्यावसायिक. शेतकरी. तसेच घटस्फोटीत. विदुर विधवा. दिव्यांग. अशा अनेक अपेक्षित वधू-वरांनी पालकांसह मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.
या कार्यक्रम प्रसंगी मा रवींद्र जाधव.(इंजिनीयर) नरेंद्र डाळिंबे माजी सरपंच मा रवींद्र कांबळे. आरपीआय (आठवले) पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मा अनिल साळवे. रिपब्लिकन सेना नेते. मा रोहित कांबळे. दौंड तालुका अध्यक्ष आर पी आय. मा जालिंदर सोनवणे सामाजिक कार्यकर्ते. नवनाथ गायकवाड आरपीआय नेते. मा अँड विजया अंगत शिंदे. अँड अक्षय शितोळे. या मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन वधु वर परिचय महामेळाव्यात सहभागी झालेल्या वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी बोलताना सांगितले. पालकांनी व वधू वरांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन मंगल परिणय जुळवण्याचा प्रयत्न करावा असा मोलाचा सल्ला आयोजकांनी दिला. तसेच युवा तरुण मुला मुलींचा विवाह जमवणे ही गंभीर समस्या सर्वत्र निर्माण झाली असल्याने पर्याय म्हणून सर्व धर्मीय वधू वर परिचय मेळावे घेणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया सम्यक प्रज्ञा फाउंडेशन दौंड संस्थापक अध्यक्ष मा साहेबराव पोळ. व त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली. सामाजिक बांधिलकी जपत सर्व धर्मीय वधु वर परिचय मेळावा आयोजित केल्या बद्दल मा पांडुरंग शेलार यांनी आपल्या भाषणातून आयोजकांचे आभार व्यक्त केले.
परिचय मेळाव्यात सहभागी झालेल्या पालक वधू-वरांना महत्वपूर्ण मार्गदर्शन व संदेश देऊन सकारात्मक प्रबोधन करत अँड विजया अंगद शिंदे मॅडम यांनी मेळाव्यातील उपस्थित पालक वधू-वरांचे लक्ष वेधले होते. मेळाव्यातील उपस्थित वधु वरांनी स्वतः परिचय देऊन आंतरजातीय देखिल विवाह करण्याची तयारी दाखवत आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात पालक वधू वर परिचय घडवुन आणण्यासाठी आयोजकांनी आव्हान केले होते. हॉलच्या बाहेर प्राणांगणात पालक वध वर एकत्रित जमल्याने मोठी गर्दी झाली होती. या प्रसंगी आयोजकांनी उपस्थित वधू वर आणि पालकांमध्ये विचार विनिमय घडवून आणण्याचा प्रयत्न केला.
त्यामध्ये प्रामुख्याने मा दिलीप पगारे प्राध्यापक डॉ. किरण जाधव सर मा अंगद शिंदे सर मा प्रभाकर बोरावडे. जगदीश सिंदगणे. अरविंद पगारे. प्रभाकर कोरे. प्रकाश लोणकर. रवी पवार सूर्यकांत चंदनशिवे कुणाल पोळ. जनाधार न्यूज दौंड तालुका प्रतिनिधी अनिल गायकवाड. नंदादेवी गावचे सामाजिक कार्यकर्ते हरिचंद्र चव्हाण. अविष्कार पोळ. भैय्या वाघमारे तेजस चंदनशिवे. मैजीराम मैराळ. जयश्रीताई माने. शिल्पाताई सिंदगणे. रमिला कातखडे. अंजली चंदनशिवे तसेच दौंड तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील या मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले.
पुणे जिल्हा स्तरीय दौंड शहरातील मा.आयु. साहेबराव पोळ संस्थापक अध्यक्ष सम्यक प्रज्ञा फाऊंडेशन यांच्या वतीने सर्व शासकीय विभागातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी यांनी फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची जबाबदारी स्वीकारून मोठ्या परिश्रमाने दौंड शहरातील व ग्रामीण भागातील बौद्ध व सर्व धर्मीय वधू वर परिचय मेळाव्याचे अतिशय उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल अनेक पालकांनी समाधान व्यक्त केले.
या मेळावा कार्यक्रमात मार्गदर्शिका ॲड.विजया अंगद शिंदे यांनी सामाजिक कार्याचा वारसा जपत आपल्या भाषणातून उपस्थित पालकांचे आणि वधु वरांचे लक्ष वेधले होते. मुला मुलींचे विवाह संदर्भात अतिशय मार्मिक व सुलभ भाषेत त्यांनी आपले विचार मांडले.
मेळावा यशस्वी होण्यासाठी मा.प्रकाश जी लोणकर,मा.रवि पवार तसेच चला बौद्ध विवाह जुळवूया ग्रुपचे मुख्य समन्वयक/संचालक मा.श्री.अंगद जी शिंदे साहेब यांनी अतिशय मोलाची कामगिरी करून पालक आणि वधु वरांना दिलासा देऊन सर्वांचे आभार व्यक्त करत एकमेकांना सहाय्य करू सर्व समाज बांधवांच्यात एक आदर्श समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी मंगलमय मैत्रीची प्रतिक्रिया व्यक्त केली.
वाचक क्रमांक :