न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज खामगाव विद्यालयात.महिला दिन साजरा. माजी विद्यार्थिनीं अधिकारी झाल्याचा गावकऱ्यांना स्वाभिमान.. पोलिस पाटील सुचिता जगताप.
By : Polticalface Team ,12-03-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १२ मार्च २०२४ दौंड तालुक्यातील मौजे खामगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथे सोमवार, दिनांक ११ मार्च २०२४ रोजी न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज खामगाव विद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला होता. या प्रसंगी
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खामगावच्या विद्यमान महिला पोलीस पाटील सौ.सुचिता प्रदीप जगताप होत्या.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख मान्यवर तसेच सत्कारमूर्ती म्हणून खामगाव विद्यालयातील उच्च पदस्थ माजी विद्यार्थिनी शितल हिरामण घुले- कनिष्ठ अभियंता, जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन, स्नेहल संजय थेऊरकर. कृषी अधिकारी महाराष्ट्र शासन, डॉक्टर अमृता कामठे पुणे ( M. B. B.S, M. D), ब्रह्मकुमारी माता क्रांतिदीदी आणि दीपादीदी, या मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी विद्यालयातील माजी विद्यार्थिनी खामगावच्या विद्यमान महिला उपसरपंच सौ.नीता नवनाथ भालसिंग यांचादेखील प्रातिनीधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. याचबरोबर यशस्वी मातांमध्ये सौ. शोभा पोपट थोरात,श्रीमती.जाईबाई हिरामण घुले, सौ.उषा आप्पासो कामठे, सौ.आशा संजय थेऊरकर या यशस्वी मातांचा,आदरपूर्वक सन्मान करुन सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या माऊशी महिलांचा आणि विद्यालयातील सर्वच महिला शिक्षिकांचा देखील सन्मान करण्यात आला.
खामगाव न्यू इंग्लिश स्कूल अँड जूनियर कॉलेज येथिल माजी विद्यार्थिनींनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उपस्थित प्रमुख मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. महिला दिनाचे औचित्य साधून. बोलताना म्हणाले. चुल आणि मुल हि पूर्वकालीन परंपरेला जपली असती तर आज आम्ही देखील त्याच विळख्यात गुंतुन राहिलो असतो. पूर्वकालीन इतिहासात महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले. यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षित करून मुलींची पहिली शाळा सुरू केली. रूढी परंपरेच्या विळख्यात गुंतलेल्या समाज व्यवस्थेत तत्पूर्वी महिलांना चितेत सती जाण्याची परंपरा होती. राजमाता जिजाऊ. अहिल्यादेवी होळकर. सावित्रीबाई फुले. रमाई आंबेडकर. या महामातांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून उद्याची युवा पिढी घडवण्याचा संकल्प केला पाहिजे. आजच्या महिला शिक्षणाच्या जोरावर सामाजिक शैक्षणिक व राजकीय अशा सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असून. भारत देशाच्या राष्ट्रपती या सर्वोच्च पदावर आणि देशाचे पंतप्रधान होण्याचा मान महिलांना मिळाला असुन. पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात महिलांना समान संधी उपलब्ध आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना दिलेला संविधानिक अधिकार. सर्व सामान्य नागरिकांना न्याय हक्क व स्वातंत्र्य असल्याचे संविधानात दिसून येत आहे. मात्र शिक्षणा अभावी अनेक घटक वंचित आहेत. या भारत देशात विविध जाती धर्माचे लोक राहतात. मात्र भारत देश हा स्वतंत्र असून राज्यघटनेवर चालतो. अशा अनेक विविध विषयांवर उपस्थित समस्त ग्रामस्थ व आजी माजी विद्यार्थिनींनी यांच्या चर्चेतून बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
खामगावच्या गाव पोलीस पाटील मा सौ सुचिता प्रदीप जगताप यांनी बोलताना सांगितले. खामगाव विद्यालयातील माजी विद्यार्थिनी सौ अनिता कदम पी आय. क्राईम ब्रँच मुंबई. पोलिस अधिकारी. सारिका निवृत्ती दळवी. डिव्हिजन मॅनेजर एसबीआय पुणे. शितल पोपट थोरात. मॅनेजर ॲमेझॉन इंडिया पुणे. यांनी उच्च शिक्षणाच्या जोरावर विविध क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाने ठसा उमटवला आहे. त्यामुळे खामगाव येथील समस्त नागरिकांना त्यांच्या कर्तुत्वाचा स्वाभिमान असल्याची प्रतिक्रिया गाव पोलीस पाटील जगताप यांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
महिला दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षा व गाव पोलीस पाटील. सौ सुचिता प्रदीप जगताप. यांनी उपस्थित आजी माजी विद्यार्थिनी तसेच सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
सदर कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट व नियोजन करून. सौ.दळवी मॅडम यांनी "आम्ही रणरागिणी- शिवकन्या या सांस्कृतिक नृत्य कार्यक्रमाने समस्त ग्रामस्थ व महिलांचे लक्ष वेधले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. टेमगिरे मॅडम, अध्यक्ष निवड व अनुमोदन सौ. सविता हाके मॅडम, कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. गुरव मॅडम, आभार प्रदर्शन सौ. खेडेकर मॅडम यांनी केले . व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दौंड सर, पर्यवेक्षक सौ. थोरात मॅडम, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. सूर्यवंशी सर, श्री तावरे सर, श्री बोत्रे सर, व श्री हाके सर, तसेच विज्ञान शिक्षक श्री. घोडके सर व श्री कांबळे सर. तसेच खामगाव पंचक्रोशीतील महिला वर्ग आजी माजी विद्यार्थिनी समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.