खामगाव हद्दीतील मुळा मुठा नदीवरील विद्युत डिप्यांची चोरी.भर उन्हाळ्यात पाण्या वाचून शेतकरी चिंताग्रस्त. अज्ञात चोरट्यान विरुद्ध गुन्हा दाखल.
By : Polticalface Team ,16-03-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.दौंड ता १६ मार्च २०२४ दौंड तालुक्यातील मौजे खामगाव ता दौंड जिल्हा पुणे येथील मुळा मुठा नदीच्या कडेला असलेल्या विद्युत रोहित्र डिप्यांची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली असल्याने. फिर्यादी वैभव धोंडीराम पाटील. सहाय्यक अभियंता शाखा यवत. राहणार समृद्धी अपार्टमेंट यवत स्टेशन रोड येवत तालुका दौंड जिल्हा पुणे यांच्या फिर्यादी वरून यवत पोलीस स्टेशन येथे गु र नं 270/2024 भादवि क 136,427अज्ञात चोरट्यान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ता 14/3/2024 रोजी सकाळी 7.00 7.00 वाचे वाचे सुमारास सुमारास आमचे अ लाईनमन काशिनाथ वसंतराव गायकवाड यांना खामगाव गावचे हद्दीत डिप्यांची चोरी झाली आहे असे फोनवरून अजित शांताराम खेडेकर यांनी सांगितले. सदर घटनेची शहानिशा करण्यासाठी यवत शाखेचे अभियंता वैभव पाटील आणि इतर वायरमन अजित शांताराम खेडेकर तसेच खामगाव पोलीस पाटील सुचिता प्रदीप जगताप. यांच्यासह घटनास्थळी जाऊन खात्री केली. सदर विद्युत वितरण डिप्यांची चोरी झाली असल्याने परीसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.भर उन्हाळ्यात पाण्या वाचून शेतीमालाची नुकसान होणार असल्याने अनेक शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. मुळा मुठा नदीच्या कडेला दक्षिण बाजूस दहा ते पंधरा विद्युत रोहित्र बसवलेली आहेत त्या ठिकाणी खांबावरच एक डीपी फोडली होती तर दोन विद्युत डिप्या खाली पडलेल्या होत्या त्यातील महत्त्वाचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले असे नमूद करण्यात आले आहे. खामगाव येथील मुळा मुठा नदीच्या कडेला असलेल्या ठिकाणी विद्युत डिपीमधील ४० किलो तांब्याची तार व त्यातील १०० लिटर ऑईल खाली सांडुन अज्ञात चोरट्यांनी आँईल सह ३३ हजार किंमतीच्या दोन व ३० हजार किंमतीची १ अशा तीन डिप्यांचे ६९ हजार रुपये नुकसान दि १४/०३/२०२४ रोजी सदर विधुत डिप्यांची चोरी झाली असल्याची खात्री करून यवत पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे नमूद करण्यात आले असून दाखल अंमलदार-सहा फौज थिकोळे. पो हवा भोर पुढील तपास करीत आहेत.
वाचक क्रमांक :