सराफ व्यावसायिकांना वाढत्या चोरी रोखण्यासाठी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांचे मार्गदर्शन
By : Polticalface Team ,Thu Dec 16 2021 14:18:00 GMT+0530 (India Standard Time)
अमोल गायकवाड ( बारामती प्रतिनिधी):वडगाव निंबाळकर (ता.बारामती) येथील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशने क्राईम पेट्रोलीग चालु आहे.वडगाव निंबाळकर येथील सराफ व्यावसायिक यांना आपला व्यावसाय करीत असताना पुर्ण लक्ष केंद्रित करून व्यावसाय करणे गरजेच आहे. त्याच बरोबर प्रत्येक सराफ व्यावसायिक यांनी आपल्या दुकानात सी सी टिव्ही कॅमेरा बसविणे ही काळाची गरज आहे. तसेच आपल्या सराफ दुकानांच्या आस पास एखादी व्यक्ती संशयास्पद वाटली तर ताबडतोब नजीकच्या पोलीस स्टेशनशी समर्पक करण्याचे आवाहन वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी केले आहे.
सध्या छोट्या मोठ्या चोरीचे प्रमाण वाढत आहे.याबाबत सराफ व्यावसायिक यांच्या मनांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊ नये. म्हणून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक सागर चौधरी,सचिन दरेकर, होमगार्ड वैभव कुंभार यांनी भेट देऊन माहीत दिली.
यावेळी वरद ज्वेलर्स,मोरेश्वर ज्वेलर्स,ए.बी.सराफ बारामतीकर, महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानास भेट दिली.दक्ष राहण्याचे आवाहन केले.
वाचक क्रमांक :