By : Polticalface Team ,23-03-2024
श्रीगोंदा:- अवघ्या विश्वाला सामाजीक सलोख्याची शिकवण देणारे संत शेख महंमद बाबा हे श्रीगोंद्याचे ग्रामदैवत आहे. बाबांचा यात्रोत्सव प्रतीवर्षी फाल्गुन महिण्यतील आमलकी एकादशीला असतो. हिंदू मुस्लिम दोन्ही भाविक भक्त बहूसंख्येने हजेरी लावतात.
यंदाच्या यात्रोत्सवाचे औचित्य साधून, पेडगावचे नवोदित कवी व लेखक कृष्णा घोलप यांनी श्रीगोंद्याच्या ऐतिहासिक व अध्यात्मिकतेवर रचलेल्या काव्यरचनेचे, यात्रा कमीटीच्या वतीने प्रकाशन करण्यात आले.
बहूत संतांची हिच कर्मभूमी l धन्य श्रीगोंदा माय धर्मभूमी ll
असे या काव्यरचनेचे धृ.पद आहे. चौदा चरणांची अभंगरूपात केलेली ही काव्यरचना आहे. याच्या माध्यमातून श्रीगोंद्यातील शिल्पकला, संतसहवास, अध्यात्म, वैभवशाली ईतीहास, सामाजीक सलोखा ईत्यादी गोष्टींवर प्रकाश टाकलेला दिसतो.
सदर काव्य प्रकाशनाचे वेळी श्रीगोंदा माजी नगराध्यक्ष मा. मनोहर पोटे, घनशाम अण्णा शेलार, बाबासाहेब भोस माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, यात्रा कमीटी,
महंमद बाबा यांचें वंशज शेख बंधू व दर्गाह ट्रस्ट अध्यक्ष तसेच यात्रेनिमित्त आलेले मेजर शंकर घोलप, भगवान घोलप, अशोक आळेकर,यांच्या सह अनेक मान्यवर भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर काव्य रचना अशी आहे -
" बहूत संतांची हीच कर्मभूमी।
धन्य श्रीगोंदा माय धर्मभूमी ।।धृ.।।
संत शेख महंमद चरनरज आहे ।
आणिक नीर वाहे सरस्वतीचे ।।
राऊळबाबा गोधड महाराज ।आणिक समाधी प्रल्हाद महाराज ।।
शिल्पकला साजीरी पाहता मन भरे ।
ऐसे राजवाडे आणिक मंदिरे ।।
सिद्धेश्वराजवळी वाजे मृदंग टाळ । पावन जाहला मैनाबाईचा माळ ।।
झेंडाचौक विजय कासया म्हणती । परतले जिंकोणी रथी महारथी ।।
विजयोत्सव जाहलासे जेथे ।
झेंडा चौक तेथे साक्ष असे ।।
अपशकुनी मानू नका दिल्ली वेस ।
शौर्य गाजवीले विरांनी पाणीपतास ।।
पीर आणि सद्गूरू एकची भाव ।
ऐसे चांभारगोंदे सलोख्याचे गाव ।।
नारायण अश्व पुढे पालखीला मान।
पंढरीला जाती पायी हिंदू मुसलमान ।।
सरस्वती माय दक्षिणेला वाहे ।
भीमेला मिळोनी पेडगाव पाहे ।।
दक्षिणकाशी महिमान आगळे ।
श्रीपुराचे सोहळे काय सांगू ।।
वर्णिता महिमान शब्दभांडार दुबळे ।
मी तो बापुडा वेगळे कैचे वर्णू ।।
अध्यात्म ईतिहास मेळ देखीयला ।
भाव उचंबळला कृष्णा म्हणे ।। "
- कृष्णा भगवान घोलप .
(मु.पो. पेडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर)
वाचक क्रमांक :