अंगणवाडी कर्मचारी राज ठाकरेंच्या भेटीला
By : Polticalface Team ,Thu Dec 16 2021 20:07:31 GMT+0530 (India Standard Time)
पाथर्डी प्रतिनिधी:
महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी विषयक माहिती भरण्यासाठी मोबाईल मध्ये पोषण ट्रॅकर ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये इंग्रजी भाषेतच माहिती भरावयास अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सक्ती केली आहे. परंतु महाराष्ट्रात मराठी भाषेचाच वापर झाला पाहिजे , अंगणवाडी कर्मचारी इंग्रजी भाषेचा वापर करणार नाहीत, अशी भूमिका राज्यातील दोन लाख कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे.
याच पार्श्वभूमीवर संभाजीनगर येथे साईश्रद्धा अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. अहमदनगरचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांच्या माध्यमातून ही भेट झाली.
यावेळी संघटनेच्या राज्यध्यक्षा सुमन सप्रे , सचिव स्मिता औटी , नगर जिल्हाध्यक्षा अनिता पालवे यांनी " राज्य सरकार पोषण ट्रॅकर ॲप मध्ये इंग्रजीची सक्ती करत असून राज्यातील दोन लाख महिला कर्मचाऱ्यांचा त्यास विरोध असून मराठी भाषेचाच वापर झाला पाहिजे " अशी मागणी राज ठाकरेंकडे केली. यावर लगेच राज ठाकरे यांनी महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांना फोन लावून पोषण ट्रॅकर ॲप मध्ये मराठी भाषा वापरा, असे सांगितले सर्व अंगणवाडी कर्मचारी महिलांनी या बद्दल राज ठाकरे यांचे आभार मानले.
यावेळी मनसे परिवहन जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे , तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ , विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रवीण शिरसाट , शहर सचिव संदीप काकडे यांसह अंगणवाडी संघटनेच्या राज्यध्यक्षा सुमन सप्रे , राज्य सचिव स्मिता औटी , नगर जिल्हाध्यक्षा अनिता पालवे , आशा बुधवंत , वर्षा चिंधे , सुवर्णा आरले , मनीषा भाबड , वंदना डोईफोडे , वृंदावनी ठोंबरे , मंगल आव्हाड , विमल राठोड , रत्ना डोंगरे उपस्थित होत्या.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद