पाईपलाईन अनुदान योजनेचा लाभ कसा घ्यायचा?

By : Polticalface Team ,04-04-2024

पाईपलाईन अनुदान योजनेचा लाभ कसा घ्यायचा?

Government Schemes  : पाईपलाईन अनुदान योजनेच्या  अंतर्गत शेतकऱ्यांना कसा लाभ मिळतो? यासाठी अटी-शर्ती नेमक्या  काय आहेत?, याचा अर्ज कसा करायचा? या सर्वांबद्दलची सविस्तर  माहिती आपण  पाहणार आहोत. 

जसे की कोरडवाहू क्षेत्र राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान या प्रकारच्या योजना देखील महाडीबीटी पोर्टलच्या अंतर्गत राबवले जातात. तसेच पीव्हीसी पाईप किंवा एचडीपीए पाईपसाठी देखील अनुदान दिले जाते.


या योजनेअंतर्गत 50 टक्के किंवा जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये एवढे अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते. ज्यामध्ये पीव्हीसी पाईपसाठी 35 रुपये प्रति मीटर आणि जास्तीत जास्त 15 हजार रुपये त्याच बरोबर एचडीपीए साठी 50 रुपये प्रति मीटर जास्तीत जास्त 15 हजार रुपये या प्रमाणामध्ये अनुदान दिले जाते. एचडीपी पाईप साठी अर्ज केले असता जास्तीत जास्त 300 मीटर पर्यंत अनुदान दिले जाते तसेच पीव्हीसी पाईप साठी अर्ज केला असता जास्तीत जास्त 500 मीटर पर्यंत अनुदान दिले जाते.


यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज करत असताना आपल्याकडे असणारा सिंचनाचा स्त्रोत याबद्दलची माहिती प्रविष्ट करणे बंधनकारक आहे. ज्यामध्ये शेततळे, विहीर किंवा इतर कोणत्या मार्गाने आपण सिंचन करत असाल तर त्याबद्दल ची माहिती सादर करणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल. अन्यथा असे अर्ज वर्षानुवर्ष तसेच पडून राहतात. त्यावर कोणतीही पुढील कारवाई होत नाही त्याच बरोबर आपल्या सातबाराला देखील या सिंचनाची नोंद असणे बंधनकारक आहे.


अर्ज भरल्यानंतर महाडीबीटी पोर्टल द्वारे एक लॉटरी जाहीर केली जाते. त्यामध्ये आपले नाव असल्यास आपल्याला प्राथमिक स्वरूपामध्ये काही कागदपत्रे सादर करावी लागतात. ज्याच्या मध्ये आपल्या जमिनीचा सातबारा, ८अ, बँकेचे पासबुक व ज्या ठिकाणी आपण पाईप खरेदी करणार आहोत त्या डीलरशिप चे कोटेशन इत्यादी माहिती सादर करावी लागते. 


पाईप लाईन योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा : 

महाडीबीटी पोर्टल वर गेल्यानंतर आपल्या आधार क्रमांकाने किंवा युजर आयडीने लॉग इन करा. त्यानंतर कृषी योजना या बटन वर क्लिक करा. त्यानंतर अर्ज करा या बटन वर क्लिक करा.

त्यानंतर सिंचन साधने व सुविधा यापुढे बाबी निवडा हे बटन आहे.


त्यावर कृपया क्लिक करा. सिंचन साधने व सुविधा यांच्या अंतर्गत आपल्याला तालुका, गाव/शहर, सर्वेक्षण क्रमांक/गट क्रमांक, मुख्य घटक, बाब, उपघटक, परिमान, कपलर व्यास या बाबी गरजेनुसार निवडा. त्यानंतर ‘सहमत आहे’ या बॉक्स वर क्लिक करून ‘जतन करा’ या बटन वर क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर एक विंडो ओपन होईल तेथे yes किंवा No लिहिलेले असेल त्या ‘No’ बटन वर क्लिक करा.


त्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये अर्ज सादर करा असे लिहिलेले असेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर पहा या बटन वर क्लिक करा. त्यानंतर आपल्या योजनेचा प्राधान्यक्रम निवडावा आणि ‘सहमत आहे’ या बटन वर क्लिक करून अर्ज सादर करा. या योजनेसाठी आपण 23 रुपये 60 पैसे जर पेमेंट केले असेल तरच आपला अर्ज हा यशस्वीपणे सादर केला जाईल.


टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.