विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल जयंती, भिमनगर सह यवतमध्ये विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी
By : Polticalface Team ,15-04-2024
,दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता १४ एप्रिल २०२४ रोजी दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन भिम नगर, येथे १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यवत ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच समीर दोरगे, ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे, माजी उपसरपंच व सदस्य नाथदेव (आबा) दोरगे, कमुभाई तांबोळी नानासाहेब आढाव, श्रीपतीराव दोरगे, या मान्यवर ग्रामस्थांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले, भिम नगर येथील युवकांनी सामुदायिक त्रिसरण पंचशिल धम्म वंदना घेतली, या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी जयंतीच्या अनुषंगाने मनोगत व्यक्त केले, यवत ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच समीर दोरगे, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य नाथदेव आबा दोरगे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष दत्ता डाडर श्रीपतीराव दोरगे, संतोष बडेकर सतिश सावंत सर ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे, फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील नेते उत्तमराव सोनवणे, यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र व समाज जन जागृती आणि संघर्षाचा लढा संभाषणातून उपस्थितीतांचे लक्ष वेधले होते,
यवत पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे व विजय कोल्हे, यांनी जयंतीच्या अनुषंगाने भीमनगर येथे भेट देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले, पोलीस शैलेश लोखंडे व होळकर यांनी कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली होती,
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्षाचा कृतिशील लढा सांगायचा झाला तर संपूर्ण आयुष्य कमी पडेल, असा इतिहास जाणून घेण्यासाठी आजच्या युवा तरुणांनी, छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर या महापुरुषांचे जीवन चरित्राचे पुस्तके चाळून वाचल्या शिवाय जीवनाच्या शर्यतीमध्ये आपण यशस्वी होणार नाहीत, वाचाल तर वाचाल हा उपदेश अंगीकृत केल्यास आपले मस्तक दुसऱ्याचे हस्तक होणार नाही,
याची जाणीव झाल्या शिवाय राहणार नाही ? शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जीवनातील त्रिकोणी कार्यक्रम युवकांनी हाती घेण्याची आवश्यकता आहे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी परदेशात उंच्च शिक्षण घेऊन ३२ डिग्र्या प्राप्त केल्या होत्या, शिक्षणाच्या जोरावर त्यांनी मानसाला मानुस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिली, न्याय स्वातंत्र्य समानता बंधूता आणि लोकशाही या मुलभूत सुविधा सर्वसामान्य नागरिकांना संविधानाच्या चौकटीत उपलब्ध करून दिल्या आहेत, तत्पूर्वीची परिस्थिती पाहता भारत देशात डॉ बाबासाहेब आंबेडकर संघर्ष करून लढत होते,
उच्च शिक्षण घेऊन बॅरिस्टर पुष्कळ झाले आहेत, ? मात्र यांच्या विषमतावादी विचाराची सांगड घालणे कदापि शक्य होणार नाही, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नाचुन साजरी करण्या पेक्षा त्यांचे विचार आजच्या युवकांनी डोक्यात घेऊन खऱ्या अर्थाने जयंती साजरी केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया फुले शाहू आंबेडकर चळवळीतील नेते उत्तमराव सोनवणे यांनी व्यक्त केली,
या वेळी यवत पंचक्रोशीतील सर्व बहुजन समाजातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती, डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन भिम नगर येथील पंचशील तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती, यवत ग्रामपंचायत कार्यालय, येथे सरपंच व ग्रामविकास अधिकारी आणि सदस्य यांच्या उपस्थितीत सर्व कामगार कर्मचारी यांनी ही कार्यालयात जयंती साजरी केली, यवत परीसरातील स्टेशन रोड सिद्धार्थ भालेराव यांच्या निवासस्थानी तसेच यवत येथील आनंदग्राम सोसायटी हॉलमध्ये जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या प्रसंगी यवत ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच समीर दोरगे, तसेच ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे, यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले, उपस्थितीतांनी सामुदायिक त्रिसरण पंचशिल धम्म वंदना घेतली,
आनंदग्राम सोसायटीच्या वतीने संचालक डॉ संतोष बडेकर व अँड प्रकाश सोळंकी यांनी उपस्थित मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी यवत ग्रामपंचायतीचे सरपंच समीर दोरगे, ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष दत्ता डाडर अँड प्रकाश सोळंकी सेवा निवृत्त पोलिस उपनिरीक्षक बबनराव गायकवाड आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले, या प्रसंगी संचालक दिपक गोवर्धन समीर पठाण गफूर चांद शेख श्रद्धा शहा, संगीता शिंदे अर्चना बडेकर मनीषा बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते,
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष व समाजातील महत्वाच्या विविध विषयावर संभाषणातून उपस्थितीतांचे लक्ष वेधले होते, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष दत्ता डाडर सेवा निवृत्त पोलिस उपनिरीक्षक बबनराव गायकवाड, अनिल गायकवाड, निलेश शेंडगे, बांपु जगताप, काळुराम शेंडगे, तसेच आनंदग्राम गृहनिर्माण सोसायटीचे संचालक पदअधिकारी तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते,
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.