By : Polticalface Team ,16-04-2024
अशा साहेबांनवर ते बंदुक तानतात खांदा आपल्यातल्याच एका व्यक्तीचा बंदूक भाजपची गोळी देखिल भाजपचीच निशाना मात्र शरदचंद्र पवार साहेबांनवर, हे आपणं सर्वजन खपवून घेणार का ? असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी आपल्या भाषणातून मतदारांना विचारला असुन येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपण भाजपा विरुद्ध लढणार कि नाही ? पण भाजपाचे नेते म्हणतात शरदचंद्र पवार साहेबांकडे नेतेच राहिले नाही ? मंग तुम्ही मतदारांनी ही निवडणूक हाती घेऊन लढणार कि नाही ? हो... मंग काही अडचण नाही, भाजपा कितीही मोठा पक्ष असला, किंवा बळाचा वापर केला तरीही काही फरक पडणार नाही, जेव्हा मतदार खऱ्या अर्थाने निवडणूक हातात घेतो तेव्हा, साम दाम दंड भेद असा कितीही दबाव तंत्राचा वापर केला, किंवा कितीही पैशाचा वापर केला, बलांड्या शक्ती पेक्षा सर्व सामान्य मतदारांची शक्ती व लोकशाहीची शक्ती मोठी असते आमदार रोहित पवार यांनी बोलताना सांगितले, पुढे ते म्हणाले देवेंद्र फडणवीस साहेब अजित दादा पवार यांच्या बाबत बोलताना म्हणायचे काही झाले तरी राष्ट्रवादी बरोबर युती होणार नाही, नाही, नाही, म्हणत होते, अजित दादा पवार यांचे नाव घेऊन.
फडणवीस साहेब म्हणायचे अजित दादा पवार जेलमध्ये चक्की पिसींग चक्की पिंसींग असे देवेंद्र फडणवीस साहेब बोलायचे आणि आता हेच नेते तुम्हाला लागतात काय ? असा थेट सवाल आमदार रोहित पवार यांनी माजी मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांना दौड तालुका यवत येथील शेतकरी मेळाव्यात विचारला आहे, बोलत असताना अचानक मज्जिद मधून भोंगा वाजवला आजान सुरू होताच आमदार रोहित पवार यांनी मज्जित मधील अजान होई पर्यंत त्यांनी आपले भाषण थांबवले, या प्रसंगी उपस्थित मतदार नागरिकांनी टाळ्या वाजवून आमदार रोहित पवार यांचे स्वागत केले, लोकसभा २०१४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते ५० दिवसांत पेट्रोल डिझेलचे भाव ५० टक्के कमी करु, आज ३ हजार ६५० दिवस होऊन गेले तरी पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले नाहीत, त्या एवजी अधिक पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहेत, घरगुती ग्यासची किंमत ४१० रुपये एवढी असताना देखील अधिक जास्त भाव वाढले असल्याचे शरदचंद्र पवार साहेब यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले बारामती येथे तीनशेहून अधिक शैक्षणिक संस्था आहेत, दौंड तालुक्यातील विद्यार्थी मुला मुलींना शिक्षणासाठी इकडे तिकडे जावे लागत आहे, दौंड तालुक्यात उंच्च शिक्षण संस्था उभारण्यासाठी तुम्ही फक्त जमीन उपलब्ध करून द्या पुढचं मी करतो काय करायचं ते असे आश्वासन मा शरदचंद्र पवार साहेब यांनी दौडकरांना दिले आहे, भाजप पक्षाला राम राम ठोकुनराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये, नामदेव बांपु ताकवणे यांनी प्रवेश करत भाजपाला जोरदार धक्का दिला आहे, प्रवेश दरम्यान बोलताना ते म्हणाले मी भाजपात असताना नेहमी राष्ट्रवादी विरुद्धच ऐकलं आहे,त्यामुळे त्यांच्या विरुद्ध भुमिका घेतल्या आहेत,मी प्रामाणिकपणे भाजपाचे काम केले, मागील १० वर्षी पासून परस्तिती बदली आहे, पूर्वीचे भाजपा नेते यांच्या मार्गदर्शनाखाली मी पक्षांमध्ये काम केले आहे, आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब यांचे आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहील अशी ग्वाही देत मतदारांना आश्वासन दिले, पुढे बोलताना ते म्हणाले राजकीय क्षेत्रातील कोळशाच्या खाणीत संपूर्ण आयुष्य काम करणाऱ्या मा शरदचंद्र पवार साहेबांनी तिळ मात्र काळा डाग लागू दिला नाही, या बाबत पवार साहेब यांच्या बद्दल निश्चित आदर वाटतो, अशी प्रतिक्रिया नामदेव बांपु ताकवणे यांनी व्यक्त केली.
या पूर्वी दौंड तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब किंवा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या दौऱ्यांमध्ये त्यांच्या बरोबर तालुक्यातील दोन विरोधी गटाचे प्रमुख आजी-माजी आमदार तालुक्यातील विकास कामांचे भूमिपूजन समारंभात मागे पुढे फिरताना तालुक्यातील जनतेने पाहिली आहेत, मात्र २०१४ पासून केंद्रात व राज्यात भाजपचे सत्ता येतात परिस्थिती बदलली असल्याचे दिसून येत आहे, भाजपा शिवसेना महायुतीची बहुमताने केंद्रात व राज्यात सत्ता आली, त्यावेळी मा, शरदचंद्रजी पवार साहेब यांनी बिनशर्त पाठिंबा भाजपला दिला होता, तसेच अजितदादा पवार यांनी पहाटेची शपथविधी घेतलेली होती हे राज्यातील लोकांनी पाहिले आहे, या पढे राज्यात अनेक घडामोडी घडल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडून खासदार आमदारांसह मा एकनाथजी शिंदे साहेब आणि मा अजित दादा पवार साहेब हे भाजपाच्या वळचणीला जाऊन बसले आहे, ( ५० खोके, सीबीआय, एडी ) अशी कधी न ऐकलेली नावे जनते समोर आली आहेत, त्यामुळे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे नेते उरले नाहीत, अशी टीका भाजपकडून केली जात आहे,आता २०२४ लोकसभा निवडणुकीत जनतेचा कोणाला कौल मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, अशी चर्चा सभेला आलेल्या मतदारांमध्ये दिसून आली आहे