ओमायक्रॉन विषाणूच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी लसीकरणावर भर द्यावा:पालकमंत्री छगन भुजबळ

By : Polticalface Team ,Fri Dec 17 2021 20:51:03 GMT+0530 (India Standard Time)

ओमायक्रॉन विषाणूच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी लसीकरणावर भर द्यावा:पालकमंत्री छगन भुजबळ परदेशात ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार जलदगतीने होतांना दिसत आहे. आपल्या देशातही या विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेता त्यावर वेळीच नियंत्रण मिळविणे आवश्यक असल्याने या विषाणूच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी लसीकरणावर भर देवून लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. आज येवला तालुक्यातील अंदरसूल व निफाड तालुक्यातील कानळद येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर,मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, ज्येष्ठ नेते किसनराव धनगे,जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, गयाबाई सुपनर, शिवा सुरासे, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, अडतीस गाव पाणी पुरवठा योजनेचे सचिन कळमकर, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, अंदरसुलच्या सरपंच सविता जगताप,सरपंच शांताराम जाधव, उपसरपंच झुंजारराव देशमुख, रुख्मिणी पगारे, शिवाजी सूपनर, हरिश्चंद्र भवर,विनोद जोशी, भाऊसाहेब बोचरे, मंगेश गवळी, दत्तात्रय घोटेकर,सचिन दरेकर, योगेश जहागीरदार, मकरंद सोनवणे, संतोष खैरनार, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, प्रकाश बागल, येवला प्रांतअधिकारी सोपान कासार, निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सिद्धार्थ तांबे, सागर चौधरी, गटविकास अधिकारी शफीक अहमद शेख आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोना साथरोगाचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला आहे. आजच्या स्थितीत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ऑक्सिजन व औषधांच्या साठ्याबाबत स्वयंपूर्ण व सुसज्ज आहे. नागरिकांनी कोरोना सोबतच ओमायक्रॉन विषाणूचा सामना करण्यासाठी त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यक आहे. देशाचे अर्थचक्र हळूहळू पुर्वपदावर येत असून जनजीवन सुरळीत होत आहे. कोरोना काळात थांबलेल्या विकास कामे पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. कोरोना काळात नागरिकांना अन्न धान्याचा पुरेशा प्रमाणात पुरवठा करण्यात आला असून शासनामार्फत राज्यातील गरजूंना शिवभोजन थाळीचा लाभ देण्यात आला आहे. तसेच कोरोना महामारीच्या प्रादूर्भावामुळे दिड ते दोन वर्षापासून बंद असणाऱ्या शाळा नुकत्याच सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचा हा शैक्षणिक प्रवास नियमीतपणे सुरू राहण्यासाठी शिक्षकांनी व पालकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपल्या पाल्यांची योग्यती खबरदारी घ्यावी, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. *अंदरसुल येथील या कामांचे झाले भूमिपूजन* येवला विधानसभा मतदारसंघातील विविध रस्ते व सामाजिक सभागृह अशा एकूण 12 विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आज पार पडले. त्यामध्ये येवला तालुक्यातील 15 कोटी 84 लक्ष रुपयांची 6 कामे तसेच निफाड तालुक्यातील 6 कोटी 48 लक्ष 50 रुपयांची 6 अशी एकूण 20 कोटी 82 लक्ष रुपयांच्या 12 विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. येवला तालुक्यातील राज्यमार्ग 10 ते 25 रस्ता ते रेल्वे स्टेशन या मार्गाचे मजबुती व डांबरीकरण,(अंदाजित किंमत 2.63 कोटी), येवला, नागाडे, धामणगाव, भारम, वाघाळे ते औरंगाबाद हद्द रस्त्याचे (अंदाजित किंमत 2.10 कोटी) मजबुती व डांबरीकरण कामाचे भूमीपूजन करण्यात आले. येवला तालुक्यातील अनकाई, कुसमाडी, नगरसुल, अंदरसुल ते पिंपळगांव जलाल प्रमुख जिल्हा मार्गाची सुधारणा करणे(अंदाजित किंमत 3.00 कोटी), मातुलठाण, धामणगाव अंदरसुल ते प्रमुख जिल्हा मार्गाचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (अंदाजित किंमत 5.00 कोटी), अनकाई, कुसमाडी, नगरसुल, अंदरसुल ते पिंपळगांव जलाल प्रमुख जिल्हा मार्गाची सुधारणा करणे(अंदाजित किंमत 03.00 कोटी), अंदरसूल येथील विरोबा मंदिरा समोर तीर्थक्षेत्र विकास योजना अंतर्गत सामाजिक सभागृह बांधणे (रुपये 11 लक्ष) इत्यादी कामांचे यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्य हस्ते भूमीपूजन करण्यात आले. *कानळद येथील या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण* निफाड तालुक्यातील एकूण 4 कोटी 48 लक्ष 50 हजार रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न झाले. निफाड तालुक्यातील कानळद येथे अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन (अंदाजित किंमत 8.50 लक्ष), निफाड तालुक्यातील कानळद येथे मुलभूत सुविधा अंतर्गत अनुसूचित जाती वस्ती गावांतर्गत रस्ता कॉक्रिटीकरण करणे (अंदाजित किंमत 10.00 लक्ष), कानळद याठिकाणी मुलभूत सुविधांतंर्गत मारुती मंदिर परिसर कॉक्रिटीकरण करणे (अंदाजित किंमत 10.00 लक्ष) तसेच आमदार निधीतुन कानळद येथील सभामंडप बांधणे (अंदाजित किंमत 10.00 लक्ष) व मुलभूत सुविधा अंतर्गत कानळद येथील नविन स्मशानभूमीचे भूमीपूजन (अंदाजित किंमत 10.00 लक्ष) इत्यादी कामांचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.