शेतकरी विरोधी निर्णय घेणाऱ्या मोदी सरकारला आज हटवणे गरजेचे मा.शरदचंद्र पवार

By : Polticalface Team ,26-04-2024

 शेतकरी विरोधी निर्णय घेणाऱ्या मोदी सरकारला आज हटवणे गरजेचे मा.शरदचंद्र पवार

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

शेतकऱ्यांच्या शेतमालाला आज भाव नाही अशा शेतकरी विरोधी निर्णय घेणाऱ्या केंद्र शासनाला हटवणे गरजेचे आहे असे देशाचे माजी कृषिमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा माननीय शरदचंद्रजी पवार यांनी आज करमाळा येथे बोलताना आपले मत व्यक्त केले पवार हे आज माढा लोकसभा मतदारसंघाचे  उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ तसेच माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या गटामध्ये जाहीर प्रवेश कार्यक्रमाच्या निमित्ताने करमाळा येथे आले असता ते बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजय मोहिते पाटील उपस्थित होते


देशाचे मा. कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार बोलताना पुढे म्हणाले की आज देशात हुकूमशाही सरकार असून अशा या हुकूमशाही सरकारला आज हटवणे गरजेचे आहे मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या अनेक मंत्र्यांना आज मोदी सरकार तुरुंगात पाठवण्याचे काम करीत आहे अशा या हुकूमशाही सरकारला देशात राहण्याचा नैतिक अधिकार नाही अशी प्रतिपादन देशाचे राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते शरद पवार बोलताना म्हणाले आणखीन बोलताना पवार पुढे म्हणाले की आज शेतकऱ्यांच्या दुधाला तसेच साखर याशिवाय कांदा या पिकाला कोणतेही भाव नाही अशा या शेतकरी विरोधी सरकारला आपण येत्या सात मे ला विरोधी मतदान करून मोदी शासनाला हटवणे आता मतदाराच्या हातात आहे


सन 1972 मध्ये मी या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो त्याकाळी मला जिल्ह्याचे नेते कै. नामदेवराव जगताप, कै शंकरराव मोहिते पाटील, कै. औदुंबर पाटील तसेच कै. विठ्ठलराव शिंदे आदी नेत्यांच्या मला राजकीय सहवास लाभला असे पवार बोलताना म्हणाले

यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री माननीय विजयसिंह मोहिते पाटील माजी आमदार नारायण आबा पाटील माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आमदार रोहित पवार, माजी आमदार उत्तमराव जानकर, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चे प्रांतिक अध्यक्ष उस्मान शेठ तांबोळी तसेच माजी नगरसेवक अल्ताफ शेठ तांबोळी होळकर वंशाचे श्रीमंत राजे होळकर, माजी नगराध्यक्ष वैभव राजे जगताप, माजी उपसभापती अतुल पाटील, सविता राजे भोसले, देवानंद बागल, सुभाष गुळवे, राजाभाऊ कदम धुळा भाऊ कोकरे डॉक्टर वसंत पुंडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी संभाजी ब्रिगेड, बळीराजा शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, करमाळा तालुका मुस्लिम संघटना आदींनी माढा लोकसभेचे उमेदवार  मोहिते पाटील यांना आपला पाठिंबा दिला


यावेळी अनेक नेत्यांची भाषणे झाली यामध्ये माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील प्रलंबित विविध विकास कामाकडे आपले लक्ष वेधले तालुक्यातील विविध प्रलंबित विकास कामाकडे माननीय शरदचंद्रजी पवार यांनी लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी माजी आमदार पाटील यांनी भाषणांमधून केली याशिवाय आमदार रोहित पवार माजी आमदार उत्तमराव जानकर एडवोकेट सविता शिंदे राजाभाऊ कदम यांची भाषणे झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ निवेदक नितीन चोपडे यांनी केले तर आभार शिवराज जगताप यांनी मानले 


1) शिंदे गटाला सोडचिट्टी तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश,,,,,


करमाळा तालुक्याचे माजी आमदार तसेच एकेकाळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी शिंदे गटाला सोडचिट्टी देऊन अखेर राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला पवार गटात माजी आमदार पाटील यांनी प्रवेश केल्याने पवार गटाची ताकद करमाळा तालुक्यात वाढली आहे


2) देशाचे नेते शरदचंद्रजी पवार तसेच उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील माजी आमदार जयंतराव जगताप यांच्या भेटीला,,,,,,


 देशाचे माजी कृषिमंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार तसेच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील या उभयतांनी कार्यक्रम अगोदर माजी आमदार जयंतराव जगताप यांची भेट घेतली या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे या भेटीनंतर शरदचंद्रजी पवार यांनी जिल्ह्याचे नेते कैलासवासी नामदेवराव जगताप यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले यावेळी माजी आमदार जयंतराव जगताप यांनी शरदचंद्रजी पवार व विजयसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार केला


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.