खाजगी साखर कारखाने विकत घेणाऱ्या नागवडे यांना या निवडणुकीत हद्दपार करा.
By : Polticalface Team ,Sat Dec 18 2021 20:03:52 GMT+0530 (India Standard Time)
प्रतिनिधी /श्रीगोंदे :- शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी कोट्यवधी रुपये कमवून खाजगी कारखाने काढले आहेत ,खाजगी कारखाने विकत घेणाऱ्या नागवडे यांना या निवडणुकीत हद्दपार करा असे आवाहन कारखाण्याचे माजी उपाध्यक्ष केशवभाऊ मगर यांनी केले . नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणुकीचे आज शेवटच्या दिवशी भाजपचे आमदार बबनराव पाचपुते व केशवभाऊ मगर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत वाजत गाजत उमेदवारी अर्ज दाखल केले, यावेळी बोलताना केशवभाऊ मगर यांनी राजेंद्र नागवडे यांच्यावर तोफ डागली वआरोपांच्या फैरी उडवण्यास सुरवात झाली आहे
श्रीगोंदे तालुक्यातील दोन साखर कारखाने यांची निवडणूक कार्यक्रम चालू आहे त्यात आज सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे कारखान्याच्या निवडणूक मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी पाचपुते समर्थक तसेच केशवभाऊ मगर तसेच आण्णासाहेब शेलार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या समर्थकांनी आपली उपस्थित दाखवत मोठ्या प्रमाणात वाजत गाजत येऊन गर्दी केली होती उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संत शेख महंमद महाराज यांच्या मंदिरात दर्शन घेऊन छोट्याखाणी कार्यक्रम आयोजित केला होता ,या वेळी बोलताना केशवभाऊ म्हणाले की हा आलेला हा सर्व जनसमुदाय कोणत्याही शिक्षण संस्थेचे अथवा कारखाना कर्मचारी नाहीत तर हे सर्व सभासद आहेत ,सभासदांच्या मालकीचा असलेला नागवडे कारखाना हा शेतकऱ्यांची कामधेनु आहे ,यावरच त्यांचे प्रपंच सुरू आहेत ,मात्र विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी या कारखान्याच्या सत्तेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची संपत्ती कमविली आहे याच संपत्तीवर परभणी येथे कोट्यवधी रुपयांचा कारखाना विकत घेऊन सुरू केला आहे , खाजगीकारखाना घेणाऱ्या नागवडे यांना या निवडणुकीतुन हद्दपार करा असे सभासदांना आवाहन केले . त्यामुळे सहकार वाचवण्यासाठी आम्ही मोट बांधली आहे यामध्ये आमदार बबनराव पाचपुते,आण्णासाहेब शेलार ,बाळासाहेब नाहटा, भगवानराव पाचपुते,लक्ष्मण नलगे,गणपत काकडे,संदीप नागवडे यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवर मंडळींच्या उपस्थिती मध्ये आज आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी डॉ प्रतिभा पाचपुते ,केशवभाऊ मगर यांच्यासह अनेक समर्थकांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे , या वेळी भगवानराव पाचपुते यांनी सांगितले की ,राजेंद्र नागवडे यांनी हुकूमशाही पद्धतीने कारभार करत आहेत ,सहकारी कारखानदारी वाचवण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत पण ही निवडणूक जिकण्यासाठी सर्वांनी दिवसरात्र एक करा आणि नागवडे यांना बाहेर चा रस्ता दाखवा आणि कारखाना वाचवा असे सांगितले . कार्यक्रमाचे प्रास्तविक संदीप नागवडे यांनी केले
चौकट :- नागवडे सहकारी साखर कारखान्यातील बिबट्या बाहेर काढा - आण्णासाहेब शेलार
आण्णासाहेब शेलार हे बोलताना म्हणाले की शेतात बिबट्या घुसला की शेतकरी , जात ,पात ,पक्ष पाहत नाही ,तो कुणाला ही सोडत नाही कारण बिबटया नुकसान करत असतो ,त्याच प्रमाणे राजेंद्र नागवडे यांनी कोणत्याच सभासद ,शेतकरी ,ऊस उत्पादक यांना सोडले नाही त्यामुळे कारखान्यातील नागवडे नावाचा बिबट्या बाहेर काढा असे त्यांनी सांगितले असे शेलार यांनी सांगितले .
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.