गुन्हा दाखल झाल्या नंतर फरार झालेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी ,कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा-: भोस
By : Polticalface Team ,Sun Dec 19 2021 09:49:30 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा :
श्रीगोंदा तालुक्यातील कृषी सेवा संघाच्या म्हसे येथील मध्यामिक शाळेवर शिक्षक असलेल्या नवनाथ बाजीराव धस आणि त्याच शाळेवर शिपाई असलेल्या आत्माराम बाजीराव धस या सख्या भावांवर बेलवंडी पोलीस ठाण्यात गून्हा दाखल झाल्याने त्यातील आत्माराम धस हे अटक होते तर नवनाथ धस हे फरार झाल्याने त्यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी शिक्षण अधिकारी माध्यमिक जि प अहमदनगर यांच्या कडे निवेदनाद्वारे करत तातडीने कारवाई न केल्यास संभाजी ब्रिगेड कोणतीही पूर्वसूचना न देता शिक्षण अधिकारी माध्यमिक जि प अहमदनगर यांच्या दालनात बेमुदत आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील शिक्षण अधिकारी माध्यमिक यांना दिला.
नवनाथ बाजीराव धस आणि आत्माराम बाजीराव धस या सख्ख्या भावावर 24 जून 2021 रोजी बेलवंडी पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल होऊन यात आत्माराम धस यांना अटक होऊन आत्माराम धस हे दिनांक 24 जून 2021 ते 1 जुलै 2021 पर्यंत जेल मध्ये होता . तसेच नवनाथ बाजीराव धस हे दिनांक 24 जून 2021 ते पुढील 53 दिवस दिवस फरार होता . त्याना औरंगाबाद खंडपीठात जामीन झाल्यावर तो हजुर झाला मात्र दिनांक 20 ऑक्टोंबर 2021 पर्यंत म्हणजेच जवळपास 116 दिवस गैरहजर होता . त्यामुळे शाळेवर कोणतेही कामकाज यांनी केले नाही . उलट संस्थापक व शाळा प्रमुख यांना सुद्धा त्रास देण्याचे काम केले आहे . त्यामुळे दोघांच्या गैरवर्तनामुळे शासकीय पगाराचा गैरवापर झाला आहे . दोघांच्या अटक व फरार कालावधीतील पगार व सर्व भत्ते हे त्यांना देण्यात येऊ नयेत , अथवा दिले असल्यास ते व्याजासकट वसूल करण्यात यावेत व त्यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत ही मागणी आम्ही करत आहोत . यापूर्वी उपरोक्त संदर्भ नुसार तक्रारदार राणी बाळ घस व धनंजय सुधाकर लाटे यांनी शिक्षणाधिकारी जि प ( माध्यमिक ) अहमदनगर गट शिक्षनाधिकारी प स श्रीगोंदा तसेच अशोक कार्ले ( श्रीगोंदा ) कृषी सेवा संघ यांना देखील अनेक वेळा कळवून सुद्धा कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही . त्यामुळे धस यांची अपप्रवृत्ती वाढत जाऊन गोरगरीब लोकांस नाहक त्रास सहन करावा लागत हे त्याचे सर्व पुरावे या निवेदनासोबत जोडत आहोत . तरी आपण धस बंधू यांवर कारवाई करणेसाठी जानीवपूर्वक टाळाटाळ करत आहात असे दिसते तरी उपरोक्त विषयी तातडीने कारवाई न केल्यास संभाजी ब्रिगेड कोणतीही पूर्वसूचना न देता शिक्षण अधिकारी माध्यमिक जि प अहमदनगर यांच्या दालनात बेमुदत आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे शिक्षण अधिकारी माध्यमिक यांना दिला.
वाचक क्रमांक :