अती ताण-तणाव हे वाढत्या आत्महत्या चे मुळ कारण - डॉक्टर जितीन वंजारे

By : Polticalface Team ,Sun Dec 19 2021 20:59:15 GMT+0530 (India Standard Time)

अती ताण-तणाव हे वाढत्या आत्महत्या चे  मुळ कारण - डॉक्टर जितीन वंजारे आजकाल युवावर्गाला योग्य समुपदेशन,योग्य सल्ला आणी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे हल्ली आत्महत्या जरा जास्तच होताना दिसतात, यात युवा वर्गाची संख्या जास्त आहे .याचा सखोल अभ्यास केल्यास हे निदर्शनास येते की अती ताण-तणाव,अती काळजी ,चिंता ,शंका ,मोह,प्रेम,विरह ,झटपट श्रीमंत होण्यासाठी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे झालेली आर्थिक हानी आणी त्यातून आलेले नैराश्य,आपल्याकडे किंवा वडिलांकडे असलेली गरिबी ,व्यवसायाकरिता नसलेले भांडवल,आर्थिक विवंचणा,आणी या सर्वामुळे त्याच्यात वाढलेली एकटेपणाची भीती या कारणामुळे वाढलेली व्यसनाधीनता या सर्वच गोष्टी आजकाल च्या वाढत्या आत्महत्याला कारणीभूत आहेत असे विचार होमीओपॅथीचे तज्ज्ञ डॉक्टर व वैचारिक सल्लागार डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले. वाढत्या आत्महत्या ही समस्या जरी येथील व्यवस्था सर्रासपणे दूर करत असेल तरी ही एक गंभीर समस्या असून देशाचा मुळ कणा हा त्या देशातील युवकवर्ग असतो आणी आज तोच युवक एका विवंचनेत अडकून आत्महत्या सारखे घातक कृत्य करत असेल तर ही या व्यवस्थेला खडबडुन जागे करण्याचा वेळ आहे.आणी त्यासंदर्भात योग्य पाऊले योग्य वेळीच येथील शासकीय ,सामाजिक आणी धार्मिक ठेकेदाराणी घेतली पाहिजेत असे परखड विचार मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले.आत्महत्या हे एकटेपणाचे आणी असह्य लोकांचे शेवटचे हत्यार आहे कारण एखादा विचार ,एखादी समस्या एखादा सल्ला आपण आपल्या थोरा-मोठ्यांना विचारला तर त्यातून मार्ग निघतो पण या प्रगत संगणक आणी मोबाईल जगात संभाषण ,चर्चा आणी विचार-विनिमय हे लोप पावत आहेत.समाज घडवन्याच्या ज्या मुळ संकल्पना आहेत त्याचा नष्ट होताना दिसत आहेत आज जग एकलकोपी होताना दिसतंय कारण जे मनोरंजनाचे आणी एकत्र येण्याचे संसाधन आहेत ते सगळे बंद झालेत आणी त्याची जागा एका निर्जीव वस्तूने घेतली आहे ती म्हणजे मोबाईल, ज्या मोबाईल मध्ये काय नाही हे विचारा ? सर्व गोष्टीने परिपूर्ण असा मोबाईल आपल्याला सर्वकाही देतो पण त्यातल घ्यायच काय ? हा मोठा प्रश्न आहे .आणी हा ज्याचा त्याचा वयक्तिक प्रश्न आहे.आपण मोबाईल ला विचारल्यावर तो सर्व माहिती इत्यम्भूत देतो यात शंका नाही पण तोच मोबाईल माणसाच्या मनातील भावना,भीती आणी विचार ओळखू शकत नाही.किंवा ते ओळखणारा मोबाईल आजपर्यंत तयार झाला नाही त्यासाठी थोरा-मोठ्यांच्या संपर्कात असणं, त्यांना सल्ला मसलत करण, त्यांच्याशी संभाषण करून योग्य सल्ला घेण ही गोष्ट आजकाल च्या युवा पिढीला कदाचित मान्यच नाही आणी त्यामुळे एकटेपणाची भावना निर्माण होऊन मुल आत्महत्या करतात. आजच्या युवा पिढी समोरील काही आव्हाहणे आहेत काही जबाबदाऱ्या आहेत आणी त्यातून निर्माण झालेले असंख्य प्रश्न आहेत आणी याच कोंडीत तो गुदमरून आत्महत्या करतो हा संशोधनाचा विषय आहे.आता आपण थोडा खोल विचार करू आजच्या युवा पिढीला 1) नौकरी 2)लग्न 3)परिपूर्ण जीवन गाडी ,पैसा ,घर ,सहल 4)सामाजिक प्रतिष्ठा 5)परिवारिक जबाबदाऱ्या 6)सामाजिक जबाबदाऱ्या 7)मुलांसाठी ची शैक्षणिक धोरण 8)नैसर्गिक आपत्ती 9)आर्थिक समस्या 10)आरोग्य, इत्यादी च्या अगदी जटील प्रक्रियेतून पार व्हावे लागत आहे त्यामुळे तो अगदी कोलमडून जाऊन नैराश्य आल्यामुळे तो आत्महत्या करतो आहे.या सुधारित युगात माणसाच्या नात्याची ,मैत्रीपूर्वक संबंधाची जोपासना होत नाही.मन स्थिर ठेवण्यासाठी अध्यात्मिक उपासनेची खूप गरज असते ती आजकाल होत नाही .महापुरुष चारित्र्य आणी संघर्ष वाचले जात नाही.मोठमोठ्या लोकांची मोठमोठी उद्योग पहिली जातात पण त्यामागचा त्यांचा त्याग आणी संघर्ष पहिला जात नाही आणी म्हणून प्रत्येक गोष्ट सहज मिळत नसते त्यासाठी संघर्ष करावा लागतो हेच आपण विसरतो. यासाठी आपल्याला आत्महत्या रोको अभियान राबवायला पाहिजे.समुपदेशन केंद्र स्थापन करायला हवेत त्याची फिरती पथक गावोगावी फिरवली पाहिजेत.घरातील कुटुंबातील व्यक्तींना आपापसात कुशल संभाषण होणे आवश्यक आहे.युवा वर्गाने थोरामोठ्यांचा सल्ला घ्यायला पाहिजे.समाजात एखाद्या व्यक्तीला अतीत्रास असेल तर आपली जबाबदारी म्हणून त्याला समुपदेशन ,सल्ला मार्गदर्शन करायला पाहिजे.युवावर्गाने आपल्या अपेक्षा कमी ठेऊन त्यावर सकारात्मक विचार करायला हवा .योग,व्यायाम ,ध्यानधारणा ,प्राणायाम करून स्वतःला स्थिर ठेवायला पाहिजे.अध्यात्माची कास धरायला पाहिजे.तुलना करायचे सोडून आपल्या पद्धतीने जीवन जगायला पाहिजे.मिळेल ती नौकरी ,मिळेल तो व्यवसाय छोटा की मोठा हा विचार न करता मिळेल ते उत्पन्न समाधान मानून समाधानी जीवन जगल पाहिजे.आत्महत्या हे महापाप आहे त्यामुळे स्वतःलाच नाही तर घर ,समाज आणी परिणामी देशाला अवकळा येऊ शकते त्यामुळे आत्महत्या रोखने ही सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे ती योग्य पार पाडा.......लेखन मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर - (होमीओपॅथीक तज्ज्ञ तथा वैचारिक समुपदेशक )-संपर्क -9922541030
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.