बारामती लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना धक्का, राम कृष्ण हरी, जनतेने वाजवली तुतारी, सुप्रिया सुळे यांना १ लाख ५० हजार. पेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयी,
By : Polticalface Team ,05-06-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ०४ जुन २०२४ बारामती लोकसभा मतदार संघ, दौंड तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी हे राजकीय विरोधी असताना देखील निवडणुकीच्या काळात एकमेकांना पेढे भरवून एकत्रित प्रचार केला, असताना पाहिला आहे,
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे यांचे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारअर्थ तालुक्यातील राजकीय आजी माजी पदाधिकाऱ्यांसह सर्व नेते पुढारी एकजुटीने प्रचार करत असताना देखील प्रत्येक गावातून अधिक जोमाने तुतारी वाजली या बाबत सर्वत्र चर्चा होत आहे, तालुक्यातील युवा तरुण पिढी राजकीय क्षेत्रात झपाट्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे. लोकसभेच्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सर्वस्वी जबाबदारी युवकांनी स्वीकारून प्रमाणिकपणे कामगिरी बजावली असल्याचीही चर्चा होत आहे, ०४ जुन रोजी बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे यांना एकुण ७ लाखा ३२ हजार ३१२ इतके मतदान झाले, असल्याने यवत ता दौंड येथील तरुण युवकांनी मनापासून केलेल्या कामाची पावती मिळाली अशी प्रतिक्रिया व्यक्त करत यवत येथील बाजार पेठेत गुलाल उधळून फटाक्यांची आतषबाजी करून एकच जल्लोष करण्यात आला असून खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या विजयाचा जयघोष करण्यात आला, तेव्हा एकच आवाज घुमला राम कृष्ण हरी वाजवली तुतारी, राम कृष्ण हरी, अशा मोठ्या जल्लोषात यवत येथे विजय महोत्सव साजरा करण्यात आला,,,
बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार मा अजित दादा पवार यांना मतदारांनीच दिला धक्का,
सुनित्रा ताई पवार, विरुद्ध सुप्रिया ताई सुळे या ननंद भाऊजयांच्यात काटे की टक्कर झाली, असल्याने बारामती लोकसभा मतदारसंघातील राजकीय क्षेत्रातील बड्या आजी माजी आमदारांनी पुढाकार घेऊन प्रचार दरम्यान प्रतेक तालुक्यातील सूत्र फिरवली असल्याचे बोलले जात आहे, मात्र सर्व सामान्य मतदार राजाने लोकशाही मार्गाने भल्या भल्यांची राजकीय गणित बिघडवली असल्याचे स्पष्ट झाले आहे, गेली पन्नास वर्षात अशी निवडणूक कधी पाहिली नव्हती,
सर्व नेते मंडळी एका बाजूला आणि मतदार एका बाजूला. अशी जेष्ठ नागरिकांनमध्ये चर्चा होत असल्याचे दिसून आले, सध्या चालू असलेले राजकारण, तरुण पिढीला का ? नकोशी वाटत आहे, राजकारणातील विरोधक हे कधी मित्र होतील. आणि मित्र कधी विरोधक होतील हे सागता येत नाही, अशी कृती करणाऱ्या व्यक्तीला तर राजकारणी म्हणतात,
बारामती लोकसभा मतदार संघात एक काळी कट्टर असलेले नेते राजकीय विरोधक गळ्यात गळे घालून मतदार राजाला मतांसाठी साकडे घातले असताना पाहिले आहे, ०४ जुन रोजी झालेल्या निकालातुन २०२४ या लोकसभेत नेमका धक्का कुणी कोणाला दिला आहे, या बाबत गाव गाड्यातील कारभारी मतदारांच्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे,
बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, खडकवासला येथील मतदारांनी मतांच्या माध्यमातून तुतारी वाजवली आहे,
पुरंदर चे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सुरुवातीला विरोध करत स्वतः अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे आव्हान केले होते, नामदार मा अजित दादा पवार यांच्या विरुद्ध नाराजी व्यक्त करुन, जुन्या आठवणींना उजाळा देत, त्यांच्या वक्तव्याची पुनरावृत्ती केली की काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे,
पुरंदर चे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सुरुवातीला अजितदादा पवार यांना प्रथम विरोध केला, आणि नंतर बिनशर्त पाठिंबा दिला, यालाच तर राजकारण म्हणतात ? इंदापूर तालुक्यातील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील सुरुवातीला विरोध करुन पुन्हा पाठिंबा दिला, हे राजकीय डावपेच मतदारांच्या लक्षात आल्याने, बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार मा सुप्रिया ताई सुळे यांच्या प्रचारअर्थ मतदारांनी पुढाकार घेऊन म्हणा, राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी असा नारा दिला, बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी दि ०७ मे रोजी मतदान झाले त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे यांना एकुण ७ लाख ३२ हजार ३१२ इतके मतदान झाले असुन, १ लाख ५० हजार पेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयी झाल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनित्रा ताई पवार यांना एकुण ५ लाख ७३ हजार ९७९ मतदान झाले आहे, मात्र बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी राम कृष्ण हरी म्हणत तुतारी वाजवली आहे, पुढील येणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषद पंचायत समिती महानगर पालिका नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया लवकरच होणार असल्याचे संकेत दिसून येत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणूक नविन चेहरे दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही,
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.