पाटस टोल प्लाझा सेवा रस्ते दुरुस्ती कॉन्ट्रॅक्टर. यवत येथील सेवा मार्ग लगच्या ड्रेनेज लाईन दुरुस्ती करण्याची मागणी,
By : Polticalface Team ,05-06-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता ०५ जुन २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे, येथील पुणे सोलापूर हायवे बाजूला असलेल्या सेवा मार्गा लगतच्या तुंबलेल्या ड्रेनेज लाईन दुरुस्ती करण्याची यवत येथील नागरिकांकडून मागणी केली जात आहे, पाटस टोल प्लाझा विभाग अंतर्गत महामार्गावरील सेवा रस्ते दुरुस्ती व ड्रेनेज लाईन दुरुस्ती संबंधित ठेकेदार कॉन्ट्रॅक्टदार यांच्या मार्गदर्शनाखाली उप व्यवस्थापक मौली चलम चरला हे सदर कामकाज पाहत आहेत, कासुर्डी टोल नाका ते इंदापूर सरडेवाडी टोल नाका या भागा पर्यंत सर्व दुरुस्ती कामकाजाची जबाबदारी संबंधित ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर त्यांच्याकडे असुन दि,०५ जुन रोजी यवत येथे त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट दिली. या वेळी यवत पीएमटी बस स्टॉप, पोलीस स्टेशन जवळील, भुयारी मार्ग असलेल्या बोगद्यात गुडघाभर पाण्याचा तलाव नेहमीच चर्चेत राहिलेला आहे, या बाबत अनेक सोशल मीडिया तसेच वृत्तपत्रांतून बातम्या प्रसिद्ध झाले आहे सेवा मार्ग लगतची ड्रेनेज लाईन नेमकी कशासाठी करण्यात आली आहे, हा प्रश्न नागरिकांना पावसाळ्यात पडल्या शिवाय राहत नाही, याचे एकमेव कारण म्हणजे या ड्रेनेज लाईन मधून पावसाचे पाणी वाहत जातच नाही, मग संबंधित महामार्ग प्रशासन ड्रेनेज लाईन साठी दर वर्षी लाखो रुपये दुरुस्ती खर्च करून देखील परिस्थिती जैसे थे अशीच आहे. यवत येथील पुणे सोलापूर महामार्गा खाली असलेल्या भुयारी पुलात (बोगद्यात) गुडघाभर पाणी साठा होत असल्याने या वर्षी पुन्हा गुडघाभर तलाव भरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे, या पावसाळी तलावाचा यवत परीसरातील नागरिकांना ना हक त्रास सहन करावा लागणार आहे, भुयारी पुलात साठलेल्या तलावातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी मुला मुलींना जावे लागणार आहे. यवत परीसरातील नागरिकांना महामार्ग ओलांडण्याचा हा एकमेव मार्ग असल्याने या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी टू व्हीलर. फोर व्हीलर. वाहतूक पीएमटी स्टॉप, असल्याने नागरिकांची सतत वर्दळ असते, यवत गावातील सेवा मार्गा लगतच्या ड्रेनेज लाईन मातीच्या ढिगार्याने तुडुंब चक्का जाम झाल्या आहेत. तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत येथे सेवा मार्गाने येतो, यवत गावातील महालक्ष्मी मंदिर प्रवेश द्वारापासून ड्रेनेज लाईन मध्ये पावसाचे पाणीच जात नसल्याने. तत्पूर्वी महामार्ग प्रशासनाने नेमकी ड्रेनेज लाईन कशासाठी केली असावी असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडल्या शिवाय राहत नाही, पीएमटी बस स्टॉप जवळील भुयारी मोरीत तलाव निर्माण होत आहे, पीएमटी बस स्टॉप. यवत पोलीस स्टेशन, यवत ग्रामपंचायत कार्यालय. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक या महत्त्वाच्या ठिकाणी सेवा मार्गावरून पावसाच्या पाण्याचा लोंढा वाहत असतो, त्यामुळे पीएमटी बस स्टॉप पासून ते शंकर कदम टपरी पर्यंत ड्रेनेज लाईन दुरुस्ती करण्यात यावी. तसेच महालक्ष्मी प्रवेशद्वारा पासून ते गाव ओढ्या पर्यंत असलेली ड्रेनेज लाईन मध्ये पावसाचे पाणी सुरळीत जाईल असे काम व्यवस्था करण्यात यावे. यवत परीसरातील महामार्गा लगच्या सेवा मार्गावरील खड्डे दुरुस्ती व पावसाचे दुषित पाण्याचे डबके या पासून यवतकरांची सुटका होईल का ?, असा प्रश्न संबंधित रस्ते दुरुस्ती विभागाने व पाटस टोल प्लाझा सेवा मार्गा दुरुस्ती ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर यांनी दखल घेऊन यवत पीएमटी बस स्टॉप लगतच्या ड्रेनेज लाईन आणि महालक्ष्मी मंदिर प्रवेशद्वारा पासून ड्रेनेज लाईन तत्काळ दुरुस्ती जोरदार पाऊस होण्यापूर्वी करून नेहमी चर्चेत असलेला प्रश्न मार्गी लागावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी मुला मुलींना जाण्यासाठी भुयारी मार्गा शिवाय दुसरा पर्याय रस्ता नाही, त्यामुळे या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी मुला मुलींना सुरक्षित रस्ता असावा भुयारी मार्गातून जात असताना गुडघाभर पाण्यातून जावे लागते हि वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. दि २८ जुन रोजी देहू आळंदी गावातुन जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे, यवत येथे पालखीचे आगमन होण्यापूर्वीच महामार्ग बाजूच्या सेवा रस्ते व ड्रेनेज लाईन वरुन सेवा रस्ते वरील वाहणारे पावसाचे दुषित पाण्याचा अडथळा मोकळा करण्यात येणार का,? तसेच महालक्ष्मी मंदिर प्रवेशद्वारा पासून ड्रेनेज लाईन दुरुस्ती होईल का ? सेवा मार्गावरील सर्व खड्डे दुरुस्ती होईल का ? अशी अनेक प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत, काही दिवसांपूर्वी या ठिकाणी सेवा मार्गातील खड्ड्यांमुळे अपघाती दुर्घटना घडल्या आहेत याची पुनरावृत्ती होऊ नये. या बाबत ग्रामस्थांमध्ये चर्चा होत आहे, पाटस टोल प्लाझा सेवा मार्ग दुरुस्ती ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर यांनी यवत येथील सेवा मार्गा लगतच्या दोन्ही बाजूंच्या तुंबलेल्या ड्रेनेज लाईनची तत्काळ पाहणी करून दुरुस्तीचे काम करण्यात यावे अशी मागणी यवत ग्रामस्थांकडून केली जात आहे.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.