कासुर्डी येथील धक्कादायक घटना, मावस बहीणीच्या लग्नासाठी माहेरी आलेल्या विवाहितेचा. विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू.
By : Polticalface Team ,12-06-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ११ जून २०२४ दौंड तालुक्यातील मौजे कासुर्डी ता दौंड जिल्हा पुणे येथील सुदाम दगडू ठोंबरे यांची मुलगी. सौ सुहानी तुषार तमनर रा.विश्रांतवाडी पुणे. हि मावस बहिणीच्या लग्नासाठी कासुर्डी येथे सुदाम दगडू ठोंबरे वडीलांच्या घरी माहेरी आली होती. मावस बहिणीचे लग्न असल्याने आई वडिलांच्या बरोबर दि १२ जून रोजी लग्नाला जाण्यासाठी ती कासुर्डी येथे आदल्या दिवशी दुपारीच सुहानी माहेरी आली होती. या वेळी आभाळ भरून आले आहे पाऊस येण्यापुर्वीच शेतातुन जनावरांना चारा घास गवत घेऊन येतो असे म्हणत. (भाऊ) शंकर सुदाम ठोंबरे शेताकडे निघाला असता. काही वेळा पुर्वीच घरी आलेली सुहानी म्हणाली. मी पण येते. बहिण-भाऊ दोघे ट्रॅक्टर वरती. संतोजी बुवा मंदिराच्या बाजूला असलेल्या त्यांच्या शेतामध्ये गेले. या वेळी आभाळ भरून आले होते.पावसाची रिमझिम नुकतीच सुरू झाली होती. ट्रॅक्टर बाजूला उभा करून बंद करण्यापुर्वी सुहानी ट्रॅक्टर मधून खाली उतरून. काही अंतरावर पुढे चालली असताना अचानक आभाळातून जोरदार वीज कडाडून सुहानीवर कोसळली विजेच्या जोरदार धक्क्याने सौ सुहानी तुषार तमनर हि खाली पडली. वीजेच्या जोरदार धक्क्याने आकस्मित सुहानीचे निधन झाले. माहेरी आलेल्या विवाहितेवर काळाने झडप घातली. हि दुर्घटना ११ जून २०२४ रोजी सायंकाळी ०५ वा जे सुमारास कासुर्डी येथे घडली असल्याने कासुर्डी येथील नागरिकांच्यात हळहळ व्यक्त केली जात असुन. कासुर्डी येथील हि दुर्दैवी घटना वाऱ्यासारखी पसरली. माहेरी आलेली लहान बहिण क्षणात डोळ्याआड झाली. २६ जानेवारी २०२३ रोजी सुहानी चे लग्न झाले होते. विश्रांतवाडी पुणे येथे ती सासरी राहत होती. १२ जून रोजी होणाऱ्या मावस बहीणीच्या लग्नासाठी ती माहेरी कासुर्डी येथे आली होती. विजेच्या धक्क्याने सौ सुहानी तुषार तमनेर हिचे आकस्मित निधन झाले असून दि १२ जून रोजी येरवडा वैकुंठ स्मशानभूमीत येथे अंत्यसंस्कार विधी होणार असल्याचे सुत्रांनी माहिती दिली. तसेच कासुर्डी येथे चार दिवसांपूर्वी कॅनॉलच्या पुलाजवळ वीज कोसळली होती. या प्रसंगी कासुर्डी येथील तीन तरुणांचा जीव थोडक्यात बचावला आहे. विजेच्या धक्क्याने तीन तरुणांचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्यांच्यातील एक जण बेशुद्ध झाला होता. वैद्यकीय औषध उपचार घेतल्या नंतर शारीरिक व मानसिक संतुलनातून ते सावरले असल्याची सुत्रांनी माहिती दिली.
वाचक क्रमांक :