By : Polticalface Team ,17-06-2024
लिंपणगाव( प्रतिनिधी)- मुख्याध्यापिका श्रीमती अलकाताई दरेकर यांनी केली 35 वर्ष शिक्षण क्षेत्रात तळमळीने ज्ञानदानाचे कार्य पार पाडले. ज्ञानदानाचा एक वेगळा ठसा उमटवत संस्था व विद्यालयाची मान श्रीमती दरेकर यांनी उंचावली. असे गौरवउद्गार सहकार महर्षी नागवडे करण्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी काढले.
डॉ. राजेंद्र प्रसाद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अलकाताई दरेकर या प्रदीर्घ सेवेतून नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. या प्रीतीर्थ श्रीगोंदा येथे तुळशीदास मंगल कार्यालय सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे हे होते.
यावेळी आपल्या शुभेच्छापर भाषणात श्री नागवडे पुढे म्हणाले की; श्रीगोंदा तालुक्याचे अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे दिवंगत प्रा. तुकाराम दरेकर सर यांचा वारसा लाभलेल्या श्रीमती अलका दरेकर यांनी शिक्षण संस्थेत 35 वर्षाच्या सेवा कालखंडात अगदी तळमळीने ज्ञानदानाचे कार्य पार पाडले. त्यांनी या क्षेत्रात शिस्तबद्ध काम करण्याचे ध्येय ठेवले. ज्या ज्या वेळी शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली तेथे निश्चितच उत्तम प्रकारे विद्यार्थी घडवले. दिवंगत प्रा. तुकाराम दरेकर व सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांचेही जिव्हाळ्याचे संबंध होते. असे सांगून श्री नागवडे आणखी पुढे म्हणाले की; शिक्षण क्षेत्रात काम करत असताना श्रीमती दरेकर यांनी 35 वर्षे कुटुंबापेक्षा ज्ञानदानाला अधिक महत्त्व दिले. त्यांच्याकडून कधीही चुकीचे काम झाले नाही. म्हणून शिक्षण संस्थेने देखील त्यांना वेळोवेळी सन्मानाची वागणूक दिली. असेल सांगून जीवनात जी व्यक्ती चांगले कार्य पार पाडते त्यांना शेवटच्या क्षणी देखील फळ चांगलेच मिळते. ही एक निसर्गाची मोठी देणगी आहे. निश्चितच शिक्षण संस्थेतील श्रीमती दरेकर यांच्यासारख्या गुणवंत मुख्याध्यापिका सेवानिवृत्त झाल्याने संस्थेला देखील त्याची उणीव भासणार आहे. असे सांगून श्री नागवडे यांनी श्रीमती दरेकर यांना पुढील दीर्घ आयुष्य साठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
आमदार बबनराव पाचपुते आपल्या शुभेच्छापर भाषणात म्हणाले की तालुक्याचे गाडेअभ्यासक दिवंगत तुकाराम दरेकर यांच्या कार्याचा वारसा श्रीमती दरेकर यांनी आपल्या ज्ञानदानाच्या कार्यातून प्रकट केल्याचे सांगत श्रीमती दरेकर यांना पुढील दीर्घायुष्यसाठी आमदार पाचपुते यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या
याप्रसंगी भाजपाचे नेते राजेंद्र म्हस्के यावेळी म्हणाले की श्रीमती दरेकर यांचा 35 वर्षाचा सेवा कार्यकाल सहजासहजी संपणारा नाही. या शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी घडवत असतानाचा संघर्ष त्यांनी जवळून पाहिला. परंतु त्यांच्या अंगी जिद्द चिकाटी मेहनत व सामर्थ्य होते म्हणूनच शिक्षण क्षेत्रात त्या यशस्वी झाल्या. विद्यार्थ्यांच्या त्या संभाषणावरूनच त्यांचे ज्ञानदानाचे कार्य सिद्ध झाल्याचे सांगितले.
याप्रसंगी नागवडे कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर; सुनील दरेकर; प्राचार्य नवनाथ बोडखे ;अरुणा वाकचौरे; अक्षय अनभुले;आप्पासाहेब शिंदे; रामदास झेंडे; दिलीप काटे; सुरेखा डावखर विठ्ठलराव दरेकर; माजी गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे; हरिदास शिर्के; बाबासाहेब इथापे आदींनी श्रीमती अलका दरेकर यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकत स्तुती सुमने वाहिनी.
सत्काराला उत्तर देताना श्रीमती अलका दरेकर भावनिक होत म्हणाल्या की शिक्षण क्षेत्रातील 35 वर्षाची मालिका माझ्या डोळ्यासमोर जाते तेव्हा अंगावर शहर येतात ज्ञानदानाचे काम पार पाडत असताना शिक्षण महर्षी बापूंची स्मृती समोर ठेवूनच ज्ञानदानाचे कार्य पार पाडले मुळातच माझे वडील दिवंगत प्रा दरेकर यांच्यासह माझ्या कुटुंबातील परिवारांचे उत्तम संस्कार लाभले संपत्तीपेक्षा आमच्या परिवाराने माणसे जोडली शिक्षण संस्थेत शालेय प्रशासन सांभाळत असताना पारगाव सुद्रिक हे मी माझे माहेर समजले अनेक वर्षे विद्यार्थी व पालकांचा पारगाव सुद्रिक गावामध्ये नोकरीच्या निमित्ताने संपर्क लाभला हे मी माझे परमं भाग्य समजते; असे सांगून श्रीमती दरेकर पुढे म्हणाल्या की; शिक्षण संस्थेत सहकार महर्षी बापू व अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे; अनुराधाताई नागवडे यांनीही प्रत्येक अडचणीत भरीव सहकार्य केले म्हणूनच मी शिक्षण संस्थेत उत्तम व कणखरपणे काम करू शकले असे सांगून उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमास आमदार बबनराव पाचपुते; राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा नागवडे कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे,संदीप नागवडे, राजेंद्र म्हस्के; सुनील अनभुले; संतोष दरेकर; सुवर्णा पाचपुते, गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे; आप्पासाहेब शिंदे; पुत्र अक्षय व तेजस अनुभुले,टिळक भोस,शिक्षक नेते एम एस लगड, रमजान हवालदार; कुंडलिकराव दरेकर; मिलिंद दरेकर; बाळासाहेब जगताप; विलासराव काकडे; पुरुषोत्तम लगड; स्मितल वाबळे यांच्यासह शिक्षण संस्थांचे आजी-माजी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन शिक्षक नेते राजेंद्र खेडकर व अशोकराव आळेकर यांनी केले आभार डॉ संतोष दरेकर यांनी मानले.
वाचक क्रमांक :