श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी ( जगताप ) कारखान्याच्या निवडणुकीत अखेरच्या दिवसापर्यंत १४८ उमेदवारांनी अर्ज दाखल
By : Polticalface Team ,Tue Dec 21 2021 16:21:51 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा :
श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी ( जगताप ) कारखान्याच्या निवडणुकीत अखेरच्या दिवसापर्यंत १४८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यापैकी ३१ अर्ज बाद झाल्याने कुकडी कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात ११७ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध झाले आहेत तर जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला.
श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी ( जगताप ) कारखान्याच्या निवडणुकीसाठी पाचपुते आणि जगताप गटाकडून अखेरच्या दिवसापर्यंत एकूण १४८ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज दि. २० डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुक छाननी प्रक्रियेत १४८ उमेदवारांपैकी ३१ उमेदवारांचे उमेदवारी विविध कारणाने अर्ज बाद झाले. कुकडी कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात ११७ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध झाले असून यात पाचपुते गटाकडून जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे यांनी इतर मागासवर्गीय मतदार संघातून २ अर्ज तर सर्वसाधारण उस उत्पादक व्यकी मध्ये १ उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यातील इतर मागासवर्गीय मतदार संघातील दोन्ही अर्ज कार्यक्षेत्रात रहिवासी नसल्याचे कारणाने बाद झाले तर सर्वसाधारण उस उत्पादक व्यकी मधील अर्ज उस न घातल्याच्या कारणामुळे अर्ज बाद झाल्याने पाचपुते गटाला मोठा धक्का बसला आहे.
वाचक क्रमांक :