चौफुला येथे. राज्य स्तरीय भीमथडी साहित्य संमेलन संपन्न. अँड प्रकाश सोळंकी. डॉ संतोष बडेकर. गणेश खळदकर. दत्ता डाडर. पुरस्काराने सन्मानित.
By : Polticalface Team ,20-06-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता.२० जून २०२४. दौंड तालुक्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने चौफुला ता. दौंड जिल्हा पुणे. बोरमलनाथ मंदिर येथे तिसऱ्या राज्य स्तरीय भीमथडी मराठी संमेलन पार पडले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
बहुजन समाजाने रामायण महाभारत प्राचीन काळाच्या अगोदर पासून मानवता वादी मुल्ये जपली आहेत. पुरुषोत्तम राम लोकांनी मनोभावे स्वीकारला. नमस्कार घालताना लोक राम राम म्हणायचे ही बहुजनांची संस्कृती आहे. यातून माणुसकी समता बंधुभाव. जोपासना केली जाते. उत्तर भारतात आक्रमण केलेल्या आर्यांनी स्वतःचा प्रभाव निर्माण करण्यासाठी मूळनिवासी भारतीय संस्कृती मोडीत काढताना त्यात बदल केले. परंतु बहुजनांनी त्याचा कधी स्वीकार केला नाही. शेवटी त्यांना बहुजन देवता व महापुरुषांचा आधार घ्यावा लागला मानवी मूल्य जोपासणे ही रामाची संस्कृती आहे. तर धर्म आणि जातीमध्ये दुरावा करणे. ही श्रीरामाची संस्कृती आहे. प्राचीन काळा पासून समाजात महिला ही प्रमुख होती. मातृसत्ताक संस्कृती मोडीत काढून सत्ताक संस्कृती वैदिकांनी बिंबविण्याचे काम केले. असे परखड मत. इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी मांडले. राज्य भरातून आलेले साहित्यिक लेखक कवी कलाकारांनी दौंड तालुक्यातील चौफुला बोरमलनाथ नगरीत आपले साहित्य सादर केले.
संमेलनाचे प्रमुख प्रवर्तक ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले साहित्याने समाज प्रबोधन होऊन वैचारिक क्रांती प्रबळ झाल्या शिवाय राहणार नाही. मात्र समाजाला प्राचीन साहित्याचा विसर पडला आहे. साहित्य आणि क्रांती होते प्रेरणा मिळते संमेलनामुळे भीमथडीचा प्रेरणादायी इतिहासाला उजाळा मिळेल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रात परिपूर्ण असलेल्या मान्यवरांना कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते. पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये अँड प्रकाश सोळंकी. पशुवैद्यकीय डॉ संतोष बडेकर. पत्रकार गणेश खळदकर. दलित चळवळीतील प्रवक्ते कवी. दत्ता डाडर. यांना पुरस्कार सन्मान चिन्ह. शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
दुसऱ्या सत्रात कवीवर्य यांनी उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधले होते. फुले शाहू आंबेडकर चळवळीतील प्रवक्ते दत्ता डाडर. यांनी स्वलीखित (राम रावण की लढाई ) सत्य आधारित ही कविता सादर केली..
१)जळत असताना रावणाने भक्तांकडे हसून पाहिले. सुधारा स्वतःच्या चारित्र्याला मोठ्या आवाजात त्याने प्रश्न विचारला..
२) सभ्य पणाचा आव आणत. दर वर्षी मला जाळता. दिवसा ढवळ्या रस्त्यावर सितेच्या आब्रुचे लचके तोडता..
३) होय केलाय गुन्हाच मी सितेचं अपहरण करण्याचा..
पण केला नाही प्रयत्नं कधी. मर्यादेची सिमा ओलांडण्याचा.
४) राक्षस असूनही तुम्हा मानवां पेक्षा ठरलो मी भारी. केला नाही अपमान कधी सितेचा माझ्या दारी..
५) हुंड्याच्या लालचे पोटी. तुम्ही हजारो सिता घरात जाळल्या.. वंशाच्या दिवट्या साठी लाखो कळ्या गर्भात मारल्या..
६) हक्क नाही तुम्हाला मला बदनाम करण्याचा. प्रयत्न करा तुम्ही स्वतःचं चारित्र्य सुधारण्याचा.
७) तुमच्या समाधानासाठी दर वर्षी मला पेटवा..पण तुमच्या मध्ये राम आहे. हे अगोदर मला पटवा....
या कवितेला उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून मनापासून दाद दिली. या वेळी जलदगती न्यायालयाचे मुंबई न्यायाधीश वसंत पाटील. दिग्विजय जेधे. लावणी सम्राज्ञी रेश्मा परितेकर. जयप्रकाश वाघमारे. रेखा काळे. अभिनेत्री गौरी रत्नपारखी. सुषमा काळे.अभिनेता सागर शेलार. तानाजी केकाण. नितिन भागवत. भाऊसाहेब फडके. विश्वास माने मोहन जाधव सागर फडके. वसंत साळुंखे. संजय मेंढे. तेजस टेंगले. दत्तात्रय डाडर. बाळासाहेब काळे. भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे उपाध्यक्ष दीपक पवार राजाभाऊ जगताप बाळासाहेब मुळे विनायक कांबळे जगदीप वन शिव रवींद्र बोरकर राजाभाऊ नातू आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवि पवार यांनी केले व उपस्थित मान्यवरांचे आभार दिपक पवार यांनी मानले.
वाचक क्रमांक :