नागवडे कारखान्यातील विरोधकांचे फॉर्म अवैध ठरवरण्यामागे राजकारण की अर्थकारण ? :- संदिप नागवडे

By : Polticalface Team ,Tue Dec 21 2021 17:45:45 GMT+0530 (India Standard Time)

नागवडे कारखान्यातील विरोधकांचे फॉर्म अवैध ठरवरण्यामागे राजकारण की अर्थकारण ? :- संदिप नागवडे श्रीगोंदा प्रतिनिधी :- सोमवार दिनांक २० डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या छाननी मध्ये पाचपुते गटाचे जवळपास २६ अर्ज निवडणूक अधिकाऱ्याने अवैध ठरविल्याने तहसील परिसरात वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते. उस उत्पादक शेतकऱ्यामध्ये व इच्छुकांमध्ये एकच चर्चा चालू होती ती म्हणजे अधिकाऱ्यांकडून फॉर्म बाद करण्याचे पाप राजकिय दबावापोटी झाले आहे की काही आर्थिक देवाणघेवाण झाली आहे. अशी चर्चा चालू असतानाच निकाल रात्री ११.३० पर्यंत लांबवला गेला. यावेळी रात्री ११.३० पर्यंत निवडणूक अधिकारी कोणत्या नियमांचे पुस्तक वाचत होते असा सवाल संदीप नागवडे यांनी उपस्थित केला आहे. राजेंद्र नागवडे यांच्या विरोधात एक संतापाची लाट निर्माण झाली आहे. ३०४ फॉर्म दाखल झाल्यानंतरच यांना धडकी भरलीयं त्यामुळे या विरोधी लाटेत अवैध मार्गाने निवडणुकीत टिकण्याची धडपड राजेंद्र नागवडे यांच्याकडून चालू आहे. पाचपुते गटाने जर निवडणूक लढवली तर हार निश्चित आहे हे लक्षात आल्यामुळे यांना लढूच द्यायचे नाही असा रडीचा डाव राजेंद्र नागवडे खेळत आहेत, परंतु आम्ही या विरोधात कोर्टात जाणार असुन निवडणुक कोणत्याही परिस्थितीत लढवून जिंकणारच असा विश्वास नागवडे यांनी व्यक्त केला. नागवडे कारखान्या सारख्या जुन्या सहकारी साखर कारखान्यातील प्रचंड भ्रष्टाचारामुळे कारखान्यावर कर्जाचा प्रचंड डोंगर झाला असुन या निवडणुकीत सत्तापरिवर्तन न झाल्यास कदाचित ही नागवडे कारखान्याची शेवटची निवडणूक ठरू शकते असा सवाल या निमित्ताने संदिप नागवडे यांनी उपस्थित केला आहे.तसेच यांचे नविन असलेले खाजगी कारखाने मात्र प्रचंड नफ्यात आहेत हे असे कसे असा प्रश्न सर्वसामान्य ऊस उत्पादकांना पडला आहे. ऊस उत्पादक शेतकर्यांच्या हितासाठी नागवडे कारखाण्याची निवडणूक आम्ही आ.बबनरावजी पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण ताकदिनीशी लढणार असून राजेंद्र नागवडे यांचा सर्व भ्रष्टाचार लोकांसमोर आणणार आहोत. यांची सर्व कुंडली आमच्याकडे आहे, आणि ती लोकांसमोर, सर्वसामान्य ऊस उत्पादकांसमोर मांडण्याचे काम आम्ही प्रचारात करणारच आहोत. त्यावेळी यांना पळती भुई थोडी झाल्याशिवाय राहणार नाही असे संदीप नागवडे यांनी सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.