श्री संत योगीराज चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या रथाला. राजा सोन्या. यवत येथील खिंल्लारी बैल जोडीला ८ वर्षा पासून मानाचे स्थान.
By : Polticalface Team ,27-06-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता. २७ जून २०२४. श्री संत योगीराज चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान बुधवार दि ०३ जुलै २०२४ रोजी सासवड येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिरातून सकाळी ११ वाजता प्रस्थान पंढरीनाथाच्या भेटीसाठी पंढरपूर कडे वाटचाल होणार असल्याचे पालखी विश्वस्तांन कडून समजले असल्याने यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील शेतकरी व वारकरी संप्रदायातील हभप बबन तात्या दोरगे. आणि हभप छबनराव कुदळे. महाराज यांच्या खिंल्लारी बैलजोडीला श्री संत योगीराज चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या रथाला. व चौघडा नगारखाना गाडीला खिंल्लारी बैलजोडीला मान असल्याने. पालखी प्रस्थानाच्या पूर्व तयारी च्या अनुषंगाने. गुरुवार दि २७ रोजी दोन्ही मानाच्या बैल जोडीला यवत येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व महालक्ष्मी देवस्थान मंदिरात देव दर्शनसाठी आणन्यात आले होते. या प्रसंगी यवत गावातून मोठ्या उत्साहात वाजत गाजत फटाक्यांच्या धुमधडाक्यात मानाच्या खिंल्लारी बैलजोडी घेऊन. ग्रामदेवतेला प्रदक्षिणा करण्यात आली. या प्रसंगी यवत पंचक्रोशीतील नागरिकांनी दोन्ही मानाच्या खिंल्लारी बैलजोडीचे उत्कृष्ट सुंदर रुपडं पाहुन समाधानात्मक आनंद व्यक्त केला. या मानाच्या खिंल्लारी बैलजोडी बाबत अधिक माहिती अशी की. यवत येथील शेतकरी कुटुंबातील व वारकरी संप्रदायातील हभप बबन तात्या दोरगे. आणि हभप छबनराव कुदळे महाराज यांच्या खिंल्लारी बैलजोडीला श्री संत योगीराज चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा रथ ओढण्यासाठी गेली आठ वर्षां पासून. सलग सासवड ते पंढरपूर वारी करण्याची संधी मिळाली असुन. पंढरपूर ते सासवड अशी वारी करण्याची संधी पालखी विश्वस्तांनी यवत येथील शेतकरी हभप बबन तात्या दोरगे. यांच्या खिंल्लारी बैलजोडी राजा सोन्या ला मान देऊन गौरविण्यात आले असल्याचे हभप बबन तात्या दोरगे महाराज यांनी सांगितले.
श्री संत योगीराज चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील नगारखाना व चौघडा. या बैलगाडीला सर्जा राजा खिंल्लारी बैलजोडीचे योगदान लाभले असून. यवत गावातील शेतकरी व वारकरी संप्रदायातील ह.भ.प. छबनराव कुदळे. महाराज यांच्या सर्जा राजा. खिंल्लारी बैलजोडीला सलग तीन वर्षां पासून चौघडा नगारखाना गाडीला बैलजोडीचा मान देऊन वारी करण्याची संधी मिळाली असल्याने गौरविण्यात आले आहे. या अनुषंगाने यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिरा समोर. दोरगे आणि कुदळे. या दोन्ही कुटुंबातील महिलांनी पालखी सोहळ्यातील मानकरी ठरलेल्या दोन्ही खिंल्लारी बैलजोडींची पूजा केली. या प्रसंगी यवत परीसरातील नागरिकांनी व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवली होती.
वाचक क्रमांक :