संत शेख महंमद महाराज यांच्या पालखीचे टाळ मृदूंगाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान
By : Polticalface Team ,04-07-2024
संत शेख महंमद महाराज यांच्या पालखीचे टाळ मृदूंगाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान..!
संत शेख महंमद महाराज पालखी सोहळ्याचे हे दुसरे वर्ष
श्रीगोंदा : प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्याचे तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा म्हणजेच मालोजीराजे भोसले यांचे गुरु शेख महंमद महाराज तसेच हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले संत श्री शेख महंमद महाराज यांचा आषाढी पालखी सोहळ्याचे सालाबाद प्रमाणे या वर्षी मोठ्या दिमाखात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. पालखी सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे मागील वर्षी आषाढी पालखी सोहळ्यास उदंड प्रतिसाद लाभला होता त्याचप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने वारकरी या दिंडीत पंढरीच्या वारीत जाण्यासाठी निघाले आहेत.
सकाळी विधिवत पूजन करून संत शेख महंमद महाराजांचे अश्व घेऊन श्रीगोंदा येथील पाच संतांच्या मंदिरांना भेटी देत श्रीगोंदा शहराला प्रदक्षिणा मारून श्रीराम मंदिरा समोर रिंगण पार पडले. या सोहळ्या साठी वारकरी मोठया संख्येने उपस्थित होते.यामध्ये पुरुषांबरोबर महिलांचीही संख्या मोठी होती.
पालखी सोहळ्यासाठी संदिप बोदगे यांनी अतिशय पिळदार याष्टीचे शुभ्र रंगाचे देखण्या दोन बैल जोड्या रथा साठी दिल्या आहेत. टाळ मृदंगाच्या गजरात आणि डीजे च्या सुमधुर संगीताच्या सुरांमध्ये वाजत गाजत फुलांच्या वर्षावामध्ये पालखीचे आज पंढरपूर कडे प्रस्थान झाले.
अशा प्रकारे दिंडी मार्गक्रमण असणार पहिला मुक्काम साळवण देवी मंदिर येथे होणार असून सात वाजता बाल कीर्तनकार ह. भ. प. माऊली महाराज मखरे यांचे कीर्तन होणार आहे. पालखी श्रीगोंदा येथून निघाल्यानंतर शेडगाव दत्त मंदिर - खेड - भिगवण - पळसदेव - इंदापूर लकी मंगल कार्यालय - सुरवड इंदापूर तालुका - अकलूज - वेळापूर - तोंडले - भाळवणी रोड खेड - पंढरपूर असे एकूण अकरा मुक्काम करत पंढरपूर मध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी पोहचणार आहे.
वाचक क्रमांक :